राज्यातील 3 लाख वृद्ध अल्झायमरच्या विळख्यात!

By admin | Published: September 21, 2014 02:33 AM2014-09-21T02:33:28+5:302014-09-21T02:33:28+5:30

एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला न ओळखणो, काही गोष्टी लक्षात न राहणो, वयस्कर व्यक्तीच्या बाबतीत अशा घटना घडत असल्यास वयोमानानुसार असे म्हणून दुर्लक्ष केले जाते.

3 lakh elderly people in Alzheimer's | राज्यातील 3 लाख वृद्ध अल्झायमरच्या विळख्यात!

राज्यातील 3 लाख वृद्ध अल्झायमरच्या विळख्यात!

Next
पूजा दामले - मुंबई
एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला न ओळखणो, काही गोष्टी लक्षात न राहणो, वयस्कर व्यक्तीच्या बाबतीत अशा घटना घडत असल्यास वयोमानानुसार असे म्हणून दुर्लक्ष केले जाते. मात्र गोष्टी विसरणो हा एक प्रकारचा आजार आहे, ही बाब कुटुंबीयांनी लक्षात घेतली पाहिजे. जनजागृती झाली नसल्यामुळे हा आजार गांभीर्याने घेण्यात येत नाही. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. एका अहवालानुसार राज्यात सुमारे 3 लाख ज्येष्ठ नागरिक हे अल्झायमरग्रस्त असण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 
डिमेंशिया, अल्झायमर या आजारांविषयी समाजामध्ये जनजागृती झाली नसल्यामुळे अजूनही अनेक जणांची वैद्यकीय तपासणी केली जात नाही. यामुळे अनेकांना अल्झायमर हा आजार असूनही त्यांना याची माहिती नसते. 2क्1क् साली इंडिया डिमेंशिया अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालामध्ये असे नमूद करण्यात आले होते की, ज्येष्ठ नागरिकांपैकी 3 टक्के नागरिकांना अल्झायमर हा आजार असतो. यानुसार राज्यात 1 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. त्याचे 3 टक्के म्हणजे 3 लाख, तर मुंबईच्या आकडेवारीनुसार, मुंबईत 12 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजेच सुमारे 36 हजार अल्झायमरचे रुग्ण मुंबईमध्ये आहेत. वयोवृद्ध लोकांमध्ये स्मृतिभ्रंश होणो हे अतिशय सामान्य कारण आहे. एखादी व्यक्ती गोष्टी विसरायला लागते तेव्हा वय हेच कारण नसून तिला अल्झायमर हा आजार झाला असण्याची शक्यता असते. 
या आजारामध्ये मेंदूतील एका विशिष्ट भागातील पेशी आकुंचन पावतात, पेशी मृत बनतात. काही वेळा अल्झायमर हा आजार अनुवंशिकतेने होऊ शकतो.  अल्झायमर झालेल्या व्यक्तींमध्ये गोष्टी विसरणो, सभोवतालच्या स्थितीचे भान न राहणो, वर्तनात बदल होणो, काही वेळा बोलायला त्रस होणो अशी लक्षणो दिसून येतात. अल्झायमर हा आजार पूर्णपणो बरा होऊ शकत नाही, मात्र पहिल्या, दुस:या पातळीवर आजार असताना औषधोपचार सुरू केल्यास त्याला नियंत्रणात ठेवणो शक्य असते. या विषयावर नवीन संशोधन सुरू आहे, नवीन औषधे येत आहेत. 
अल्झायमर झालेल्या व्यक्तीने न्यूरोलॉजिस्ट, तज्ज्ञांचा सल्ला घेणो आवश्यक आहे, असे ग्लोबल रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. पंकज अगरवाल यांनी 
सांगितले.  
 
अल्झायमर हा आजार पहिल्या अथवा दुस:या पातळीवर असताना निदान झाल्यास तो वेगाने वाढणार नाही, नियंत्रणात राहील याची काळजी औषधांमार्फत घेऊ शकतो. मात्र अल्झायमर या आजारावरचा खरा उपाय हा ‘त्या व्यक्तींना प्रेम देणो, त्यांची काळजी घेणो’ हाच आहे. या व्यक्तींबरोबर सतत 24 तास एखादी व्यक्ती असणो आवश्यक आहे. कारण एखादी अल्झायमर झालेली व्यक्ती कोणाचेही लक्ष नसताना घराबाहेर पडली तर त्या व्यक्ती परत एकटय़ा अथवा कोणाच्याही मदतीने घरी येऊ शकत नाही. या आजाराबाबत जनजागृतीची गरज आहे. 
- शैलेश मिश्र, सचिव, अल्झायमर सोसायटी, 
मुंबई- संस्थापक अध्यक्ष, सिल्व्हर इनिंग फाउंडेशन
 
अल्झायमर 
म्हणजे काय? 
लहान, दैनंदिन गोष्टी विसरायला होणो, कालांतराने भूतकाळ विसरायला होणो. मेंदूतील विशिष्ट भागातील पेशी आकुंचन पावणो, पेशी मृत बनणो यालाच वैद्यकीय परिभाषेत ‘अल्झायमर’ असे म्हटले जाते. 
 
संकल्पना : ‘अल्झायमर आजाराचा धोका कमी करू शकतो का?’ अल्झायमर हा आजार पूर्णपणो बरा न होणारा आजार असल्यामुळे हा आजार कसा होणार नाही याची काळजी घेणो अधिक गरजेचे आहे. यामुळेच यंदाची संकल्पना ही ठरविण्यात आली आहे. अल्झायमर झाल्यावर बरा होऊ शकत नाही, मात्र जीवनशैली चांगली ठेवल्यास त्यामध्ये नक्कीच बदल करता येऊ शकतात, हीच यंदाच्या दिनाची संकल्पना जागतिक पातळीवर ठरविण्यात आली आहे. हा दिन 1994 सालापासून साजरा केला जातो. 
 
धोका कमी करण्यासाठी उपाय 
हृदयाचे कार्य चांगले राहील याची काळजी घ्या, मेंदूला चालना द्या, अलिप्त न राहता जनसंपर्कात राहा, सकस आहार घ्या, शारीरिक व्यायाम करा.
 
अल्झायमरची लक्षणो 
एखाद्या वृद्ध व्यक्तीला काही गोष्टी पटकन लक्षात येत नाहीत, काही गोष्टी लक्षात राहत नाहीत अशावेळी कुटुंबीय त्यांचे ‘वय झाले आहे’, असे म्हणतात. लक्षात ठेवण्याची मेंदूची क्षमता कमी होत जाणो, हे फक्त वाढत्या वयाचे लक्षण नसून हा एक आजार आहे. डिमेंशियाचा एक प्रकार म्हणजे अल्झायमर हा आहे. डिमेंशिया आजारामध्ये त्या व्यक्तीची लक्षात ठेवण्याची क्षमताच फक्त कमी होत नाही, तर त्यांच्या वर्तनामध्येही काही बदल होतात.   
 
अल्झायमर असलेली व्यक्ती सुरुवातीच्या काळात लहान लहान गोष्टी विसरायला लागते. जेवण झालं का, लोकांची नावं, एखाद्या ठिकाणी जाण्याचा रस्ता, व्यक्तीचा चेहरा इत्यादी. या पायरीवर आजार असताना ती व्यक्ती वर्तमान काळातील गोष्टी विसरत असते. मात्र कालांतराने व्यक्ती भूतकाळातील घटना विसरायला लागते. यानंतर आजार वाढत गेल्यावर दैनंदिन व्यवहारदेखील विसरायला लागते, एखादी कृती करताना त्याला काय म्हणतात हेही लक्षात येत नाही.     
 
रुग्णाच्या वर्तनात होणारे बदल
व्यक्ती चिडचिडी बनते, लोकांशी संपर्क कमी करते, सगळ्याच प्रकारची रुची कमी होत जाते.
अल्झायमरग्रस्त व्यक्तींशी 
कसे वागावे?
त्यांना कधीही ‘नाही म्हणू नये’, त्यांना कोणतीही गोष्ट करताना रोखू नये, त्यांच्याशी वाद घालू नये, यांच्याशी मोठय़ा आवाजात बोलू नये. 

 

Web Title: 3 lakh elderly people in Alzheimer's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.