गोवा : राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीविना 3 लाख वाहनं कोकणाकडे रवाना, रायगड वाहतूक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 02:24 PM2017-08-24T14:24:48+5:302017-08-24T14:56:33+5:30

रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळून वाहतूक सुरळीत ठेवून चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होवू द्यायचा नाही, असा चंग रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी बांधून गेल्या 15 वर्षांच्या इतिहासात प्रथमच वास्तवात उतरवून दाखविला आहे. 

3 lakh vehicles transported to Konkan, traffic congested on Goa National Highway, Excellent performance of Raigad Transport Police | गोवा : राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीविना 3 लाख वाहनं कोकणाकडे रवाना, रायगड वाहतूक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी 

गोवा : राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीविना 3 लाख वाहनं कोकणाकडे रवाना, रायगड वाहतूक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी 

Next

जयंत धुळप/ रायगड, दि. 24 - गणेशोत्सवाकरीता कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांच्या गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास म्हणजे राज्याच्या गृह विभागा समोरील एक मोठे आव्हानच असते. दुरवस्थेतील गोवा राष्ट्रीय महामार्ग, त्यावरील खड्डे आणि त्यामुळे तासनतास होणारी वाहतूक कोंडी, त्यातून उफाळून येणारा जनप्रक्षोभ यापैकी यंदा काहीही अनुभवास आले नाही. गोवा महामार्ग दुरवस्थेत असतानाही पळस्पे(पनवेल) ते कशेडी(पोलादपूर) या 82 किमी अंतराच्या रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळून वाहतूक सुरळीत ठेवून चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होवू द्यायचा नाही, असा चंग रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी बांधून गेल्या 15 वर्षांच्या इतिहासात प्रथमच वास्तवात उतरवून दाखविला आहे.  बुधवार दुपारी 12 वाजल्या पासून गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत तब्बल 3 लाख विविध प्रकारची वाहने कोकणात सुखरुप रवाना झाल्याची नोंद वडखळ आणि कशेडी येथील रायगड वाहतूक पोलीस केंद्रावर झाली असल्याची माहिती रायगड वाहतूक पोलीस विभागाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे यांनी दिली आहे.

गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पळस्पे(पनवेल) ते कशेडी (पोलादपूर) या रायगड जिल्ह्यातील गोवा महामार्गाच्या टप्प्यात, एक स्वतंत्र पोलीस अधीक्षक, एक अप्पर पोलीस अधीक्षक, 6 पोलीस उप विभागीय पोलीस अधिकारी, 13 पोलीस निरीक्षक, 47 उप निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 310 वाहतूक नियंत्रक पोलीस, 10 क्रेन्स, 10 अॅम्ब्युलन्स, 10 पोलीस वायलेस जिप, संभाव्य वाहतूक कोंडीच्या पारंपरिक 48 ठिकाणी सीसीटीव्ही 24 अवर्स वॉच, 52 माहिती फलक तर 150 दिशा दर्शक फलक असा वाहतूक नियंत्रण व्यवस्थेतून यंदा गोवा महामागार्वरील वाहतूक  विनाकोंडी सुरळीत ठेवण्यात यश आले आहे. 

गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडीच्या पारंपरिक ठिकाणी तात्पुरत्या तंबूंची उभारणी करुन त्यामध्ये 24 तास राहून वाहतूक नियंत्रणाचे काम पोलीस करत आहेत. यामध्ये महिला पोलीस कमर्चाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. 24 तास काम करुन थकलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महामागार्वरुन जाणारे चाकरमान आवर्जून थांबून धन्यवाद देत आहेत. त्या धन्यवादामुळे आमचा हुरुप वृद्दीगत होत असल्याची प्रतिक्रीया पोलादपूरचे पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी दिली आहे.

रायगड पोलिसांच्या या 24 तास अथक सेवाकार्यास अनेक सहकार्याचे हात लाभत आहेत. लोकमत आणि रायगड वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक नियंत्रण व सुरक्षा विषयक बॅनर्स सर्वत्र यापूर्वीत लावण्यात आले आहेत. वाहतूक नियंत्रमाकरीता आवश्यक 100 रेड बॅरिकेट्स डोलवी-धरमतर येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने रायगड पोलिसांना वडखळ येथे सुपूर्त करण्यात आले. तर वाहतूक विनाकोंडी अखंड सुरु ठेवण्यात यशस्वी होत असलेल्या वाहतूक पोलीस आणि कर्मचाऱ्यांना जेएसडब्ल्यूचे वरिष्ठ अधिकारी विनय नेने,अरुण शिर्के, कुमार थत्ते यांनी वडखळ येथे गुरुवारी सकाळी गुलाबपूष्प देवून अभिनंदन करुन त्यांचा उत्साह द्वीगुणित केला.

कोणत्याही परिस्थितीत बेदरकार ओव्हरटेकींग होणार नाही, या एक मुद्याला प्राधान्य दिल्याने वाहतूक कोंडी टाळणे शक्य झाले आहे. त्यामुळे विनाखंड वाहतूक सुरु ठेवण्यात यश येत असल्याचे वाहतूक शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे यांनी सांगीतले. दरम्यान राष्ट्रीयमहामार्गावरील दारुची दूकाने बंद आणि बार बंद या सर्वाच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गेल्या पाच दिवसात एकही मद्यपी चालक वा मद्यपी प्रवासी यांच्यावर कारवाई करण्याची वेळ पोलिसांना आली नाही, हा यंदाच्या वाहतुकीतील एक अत्यंत महत्त्वाचा लक्षवेधी मुद्दा ठरला असल्याचे अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

 


 

Web Title: 3 lakh vehicles transported to Konkan, traffic congested on Goa National Highway, Excellent performance of Raigad Transport Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.