सौर प्रकल्पातून ३ लाख युनिट वीजनिर्मितीचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2016 02:35 AM2016-09-20T02:35:17+5:302016-09-20T02:35:17+5:30

२५० किलोवॅट क्षमतेचा रुफटॉप सौरऊर्जा प्रकल्प मुंबईतील सर्वात मोठा प्रकल्प असून, या प्रकल्पाद्वारे दरवर्षी ३ लाख युनिट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.

3 million units of electricity generation from the solar project | सौर प्रकल्पातून ३ लाख युनिट वीजनिर्मितीचे लक्ष्य

सौर प्रकल्पातून ३ लाख युनिट वीजनिर्मितीचे लक्ष्य

Next


मुंबई : दक्षिण मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे बसविण्यात आलेल्या २५० किलोवॅट क्षमतेचा रुफटॉप सौरऊर्जा प्रकल्प मुंबईतील सर्वात मोठा प्रकल्प असून, या प्रकल्पाद्वारे दरवर्षी ३ लाख युनिट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.
सूर्यापासून स्वच्छ आणि पर्यारवरणपूरक उर्जा मिळवण्याचा मार्ग याद्वारे दाखवण्यात आला असून, २०२२ पर्यंत देशात निर्माण होणाऱ्या एकूण उर्जेच्या १० टक्के सौरऊर्जेचे उत्पादन वाढविण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा केंद्राने यापूर्वी केली आहे. त्याला यामुळे हातभार लागणार आहे. ऊर्जा निर्मिताबाबत योग्य भूमिका घेतल्यास आपण आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण या तिन्ही आघाड्यांवर विकास साधू शकतो. सौरऊर्जा प्रकल्पाला महत्त्व येण्यामागचे कारण म्हणजे सौर ऊर्जा निर्मितीनंतर कोणत्याही नकारात्मक गोष्टी अस्तित्वात येत नाहीत. तसेच जागतिक हवामान बदलांशीही ते पूरक आहे. सध्या राज्यभरात वीजेची मोठी मागणी असून ती कशाप्रकारे निर्मिली जाते, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. या सर्व दृष्टीने हा प्रकल्प अंत्यत महत्त्वाचा आहे, असेही वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष कमल मोरारका यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 3 million units of electricity generation from the solar project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.