मुंबईत जे.जे. मार्ग परिसरात 125 वर्ष जुनी 6 मजली इमारत कोसळली, 22 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 08:59 AM2017-08-31T08:59:40+5:302017-08-31T21:37:43+5:30

मुंबईतील जेजे मार्ग परिसरात 6 मजली इमारत कोसळल्याची माहिती मिळते आहे. या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

3 storey building collapses in JJ road in Mumbai; Some people are afraid of being stuck under the deck | मुंबईत जे.जे. मार्ग परिसरात 125 वर्ष जुनी 6 मजली इमारत कोसळली, 22 जणांचा मृत्यू

मुंबईत जे.जे. मार्ग परिसरात 125 वर्ष जुनी 6 मजली इमारत कोसळली, 22 जणांचा मृत्यू

googlenewsNext

मुंबई, दि. 31- मुंबईतील जे जे मार्ग परिसरात सहा मजली इमारत कोसळल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरु झालं आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तसंच स्थानिक लोकांकडूनही बचावकार्य केलं जातं आहे. एनडीआरएफचे 45 जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

- 1.45PM- इमारत दुर्घटनेसाठी ट्रस्ट सरकार व महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे. सरकारने नैतिक जबाबदार स्वीकारली आहे यापुढे कोणतीही दया न दाखवता धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना जबरदस्तीने खाली करण्यास भाग पाडू. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची प्रतिक्रिया.

- 1.39PM- ढिगाऱ्याखाली अडकलंय २० दिवसांचे बाळ; एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरु.

- 1.16PM- एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत एकूण २१ जणांना यशस्वीपणे ढिगाऱ्याबाहेर काढलं.

- 12.44PM- गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर घटनास्थळी पोहोचले.

- 12.42PM-  मृतांचा आकडा 10 वर (7 पुरूष 3-महिला) तर 15 जण जखमी.

- 12.23PM - मृतांचा आकडा आठ.

- 12:22 PM:  - भेंडीबाजार हुसैनीवाला इमारत दुर्घटना- 60 ते 65 जण ढिगा-याखाली अडकले असल्याचा मनपाचा अंदाज.

- 12:05 PM: हुसैनीवाला इमारत दुर्घटना- महापालिका आयुक्त अजॉय मेहता आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर घटनास्थळी दाखल. अजॉय मेहतांना अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांदळे माहिती देत आहेत.

- 11:59 AM : दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी झाल्याची माहिती.

- 11:32 AM: दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू.

- 11:24 Am: दुर्घटनेत आमदार अमीन पटेल घटनास्थळी मदत करत आहेत. 

- 11:19 AM : दुर्घटनेत उद्योगमंत्री सुभाष देसाई घटनास्थळी दाखल. इमारत धोकादायक असल्याची सुभाष देसाई यांची माहिती. या घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले जातील तसंच कारवाई होणारा.

- 11.05 Am :  दुर्घटनेत मृतांची संख्या चार तर 13 जण जखमी

- 10:47 Am : भेंडीबाजार परिसरात सहा मजली इमारत कोसळली, घटनास्थळावर आग लागल्यानंही बचावकार्यात अडथळा.

जे जे जंक्शन येथील पाकमोडिया स्ट्रीटवर सकाळी आठच्या सुमारास पाच मजली हुसुैनीवाला निवासी इमारत कोसळली. या इमारतीचे एकुण तीन भाग असून त्यातील दोन इमारती कोसळल्या आहेत तर तिसरी इमारत ही आर्धी कोसळली असून इमारतीचा आर्धा भाग तसाच उभा असल्याची माहिती मिळते आहे.

 इमारतीच्या शेजारी असलेल्या बैठ्या चाळीवर या इमारती कोसळल्या आहेत. ढिगाऱ्याखाली ३5 ते 40 जण अडकले असावे असं सांगितलं जातं आहे. या दुर्घटनेचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. इमारतीमध्ये एकूण नऊ कुटुंबं राहत होती. दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शेजारच्या दोन इमारतीमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.  ही इमारत 100 ते 125 वर्ष जुनी असल्याचीही माहिती समोर आली आहे. या इमारतीत एकुण 9 कुटुंबं रहात असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. इमारत कोसळल्यानंतर एक-दोन जण स्वतःहून बाहेर आले. हुसेैनीवाला इमारतीमध्ये एकूण 12 खोल्या आणि 6 गोडाऊन होते. या गोडाऊनमध्येही लोकं राहत असल्याचं समजतं आहे.

गेल्या महिभरात मुंबई आणि उपनगरात इमारत कोसळल्याची तिसरी घटना आहे. यापूर्वी २५ जुलै रोजी घाटकोपरमध्ये साई दर्शन इमारत कोसळली होती. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता. तर दोन दिवसांपूर्वी विक्रोळीत इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता.


Web Title: 3 storey building collapses in JJ road in Mumbai; Some people are afraid of being stuck under the deck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात