उकळते पाणी अंगावर पडल्याने 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
By admin | Published: March 8, 2017 12:11 PM2017-03-08T12:11:16+5:302017-03-08T12:11:16+5:30
दोन आठवडे मृत्यूशी सुरु असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली. हेमंत सांताक्रुझच्या फुलवाली चाळीत राहायचा.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - उकळेत पाणी अंगावर पडून गंभीररित्या जखमी झालेल्या 3 वर्षांच्या मुलाचा अखेर सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला. हेमंत प्रेम सिंह (3) या असे या मुलाचे नाव असून, दोन आठवडे मृत्यूशी सुरु असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली. हेमंत सांताक्रुझच्या फुलवाली चाळीत राहायचा. 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास हेमंत घरात खेळत असताना त्याच्या अंगावर उकळते पाणी पडले.
यामध्ये तो 50 टक्के भाजला होता. त्याला गोरेगावच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हेमंतची आई तिच्या एकवर्षाच्या मुलाला अन्न भरवत असताना हेमंत तिथे स्टोव्ह जवळ खेळत होता. हेमंतच्या आईने भात बनवण्यासाठी स्टोव्हवर पाणी उकळत ठेवल होते. हेमंतने खेळण्याच्या नादात स्टोव्हचा पाईप ओढला आणि सर्व उकळते पाणी त्याच्या अंगावर पडले.
हेमंतच्या पोटाचा आणि मानेचा भाग गंभीररित्या भाजला होता. त्याला आधी सायना रुग्णालयात दाखल केले. तिथून त्याला गोरेगावच्या रुग्णालयात हलवले. हेमंतला दुस-या रुग्णालयात हलवले त्याचदिवशी त्याचा मृत्यू झाला. सांताक्रुझ पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.