राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने ३ वर्षाची शिक्षा
By Admin | Published: May 9, 2014 09:13 PM2014-05-09T21:13:26+5:302014-05-09T22:15:57+5:30
राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा अवमान सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीस ३ वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. वसमत येथील न्यायालयाने हा निकाल दिला.
वसमत(जि.हिंगोली) : राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा अवमान सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीस ३ वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. वसमत येथील न्यायालयाने हा निकाल दिला.
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील ग्रामपंचायतीमध्ये २६ जानेवारी २००९ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी बापुराव सूर्यभान पितळे (रा.पांगरा शिंदे) याने राष्ट्रीय ध्वज खाली उतरवून ध्वज घेऊन तो पळून गेला. या प्रकरणी ग्रामसेवक मंचक जोध यांच्या फिर्यादीवरून कुरूंदा पोलिस ठाण्यात पितळे याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.(वार्ताहर)