जालन्यात बँकेची 30 लाखांची रोकड लुटली
By Admin | Published: October 19, 2014 01:41 AM2014-10-19T01:41:21+5:302014-10-19T01:41:21+5:30
येथील नवा मोंढा भागात भरदिवसा चिखली बँकेची रोकड नेणा:या पथकावर हल्ला करून एका चोरटय़ाने 3क् लाखांची रोकड पळवून नेली.
जालना : येथील नवा मोंढा भागात भरदिवसा चिखली बँकेची रोकड नेणा:या पथकावर हल्ला करून एका चोरटय़ाने 3क् लाखांची रोकड पळवून नेली. गजबजलेल्या मारुती मंदिरासमोरील रस्त्यावर हा प्रकार शनिवारी घडला. या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मोंढा शाखेला आवश्यक असणारी 3क् लाखांची रोकड याच बँकेच्या जिंदल मार्केटमधील मुख्य शाखेतून रोखपाल विलास नारायण बैरागी हा शिपाई गोविंद चंदू व्यास व रिक्षाचालक संतोष भोंडे यांना सोबत घेऊन नेत होता. रिक्षा मोंढय़ातील हनुमान मंदिराजवळ येताच विनाक्रमांक असलेली स्कार्पिओ समोर आडवी लावण्यात आली. गाडीतून चेह:यावर काळा कपडा बांधलेली उंचीपुरी, पँट व टी शर्ट घातलेली गोरी व्यक्ती बाहेर आली. तिने रिक्षाचालक व शिपाई व्यास यांच्यावर मिरची पूड टाकली. बैरागी यांना धक्का मारून हातावर चाकूने वार केला. एका पायाने रिक्षातील पैसे असलेल्या पेटीला लाथ मारली. त्या वेळी गाडीत चालक व अन्य दोघे बसलेले होते, असे विलास बैरागी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आह़े (प्रतिनिधी)