बॅग नसल्याने सोडले ३० लाख

By admin | Published: January 28, 2015 05:11 AM2015-01-28T05:11:38+5:302015-01-28T05:11:38+5:30

खासगी कंपनीच्या व्हॅनमधून एटीएम मशिनमध्ये भरणा करण्यासाठी निघालेली एचडीएफसी बँकेची ३० लाखांची रोकड दरोडेखोरांनी मागे सोडली होती.

30 lakhs left without a bag | बॅग नसल्याने सोडले ३० लाख

बॅग नसल्याने सोडले ३० लाख

Next

मुंबई : खासगी कंपनीच्या व्हॅनमधून एटीएम मशिनमध्ये भरणा करण्यासाठी निघालेली एचडीएफसी बँकेची ३० लाखांची रोकड दरोडेखोरांनी मागे सोडली होती. त्यांनी १ कोटी ६५ लाखांची रोकड चार बॅगांमध्ये भरली. मात्र व्हॅनमधील उर्वरित रोकड भरण्यासाठी त्यांच्याकडे बॅग नव्हती. त्यामुळे त्यांनी ही रोकड मागे सोडली. मात्र त्यावर कटात सहभागी असलेला चालक तारिक रेहमतुल्ला खान याने डल्ला मारला.
गुन्हे शाखेच्या अंधेरी युनीटचे वरिष्ठ निरिक्षक दिपक फटांगरे आणि पथकाने या दरोडयातील एकूण ७ आरोपींना गजाआड केले आहे. सोबत लुटलेली १ कोटी ९५ लाखांपैकी १ कोटी ७९ लाखांची रोकड हस्तगत करण्यात युनीट अधिकाऱ्यांना यश आले आहे.
या दरोडयाच्या कटात सिक्युरीटी ट्रान्स इंडिया कंपनीचा गार्ड सद्रेआलम शोहरतअली खान, खुर्शिद अब्दुल शेख आणि व्हॅन चालक तारिक सहभागी होते. एटीएम मशिनमध्ये रोकड भरणा करण्याचे कंत्राट या कंपनीकडे आहे. १६ जानेवारीला एचडीएफसी बँकेची २ कोटी १३ लाखांची रोकड घेऊन कंपनीची व्हॅन मीरारोडच्या दिशेने निघाली होती. ती विलेपार्ले येथे लुटण्यात आली.
खुर्शिद हा मुख्य आरोपी आहे. चार महिन्यांपुर्वी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला लागलेल्या खुर्शिदने सद्रेआलम व तारिकला नोकरीला लावले. ठरलेल्या कटानुसार चहात गुंगी आणतील अशा गोळया मिसळून त्या व्हॅनमधील गार्ड व रोकडीची जबाबदारी असलेल्या कस्टोडीयनला पाजून लूटमार करायची. त्या दिवशी तारिक व्हॅन चालवत होता. सद्रेसोबत बसर हसन अहमद खान गार्ड म्हणून तर कस्टोडीयन धर्मेश पेडामकरही व्हॅनमध्ये होते. ठरल्याप्रमाणे वरळीत थर्मासमध्ये आणलेला गुंगी आणणारा चहा पेडामकर, बसर यांना पाजण्यात आला. तसेच संशय येऊ नये म्हणून कटात सहभागी असलेल्या तारिकलाही पाजण्यात आला. मात्र तारिकचा कप आधीच ठरलेल्या कटानुसार अर्धाच भरलेला होता. पेडामकर, बसर वांद्रे येईपर्यंत
बेशुद्ध पडतील, असा अंदाज
होता. (प्रतिनिधी)

Web Title: 30 lakhs left without a bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.