थकविली ३०० कोटींची पाणीपट्टी

By admin | Published: November 30, 2015 02:02 AM2015-11-30T02:02:33+5:302015-11-30T02:02:33+5:30

शहरातील प्रमुख शासकीय कार्यालये, हॉटेल, बांधकाम व्यावसायिक, हॉस्पिटल अशा नऊशे थकबाकीदारांनी ३०० कोटी रुपयांची पाणीपट्टी अनेक दिवसांपासून थकविली असल्याचे उजेडात आले आहे

300 crores of water torn by tired | थकविली ३०० कोटींची पाणीपट्टी

थकविली ३०० कोटींची पाणीपट्टी

Next

पुणे : शहरातील प्रमुख शासकीय कार्यालये, हॉटेल, बांधकाम व्यावसायिक, हॉस्पिटल अशा नऊशे थकबाकीदारांनी ३०० कोटी रुपयांची पाणीपट्टी अनेक दिवसांपासून थकविली असल्याचे उजेडात आले आहे. या थकबाकीच्या वसुलीकडे प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्याने ती आणखीनच फुगत चालली आहे. यंदा महापालिकेचे उत्पन्न कमी व खर्च जास्त होत असल्याने थकबाकीच्या वसुलीकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
राज्य शासनाने एलबीटी बंद केल्याने महापालिकेला मोठ्या प्रमाणात राज्य शासनाच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने उत्पन्नाचे इतर मार्ग शोधण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. यंदाच्या उत्पन्न खर्चाचा सहामाही आढावा घेतला असता त्यामध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे अनावश्यक खर्चांना कात्री लावण्याच्या सूचना आयुक्त कुणाल कुमार यांनी दिल्या होत्या. मात्र त्याच वेळी उत्पन्न वाढीसाठी प्रशासन फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
पाणीपट्टी थकविणाऱ्या ९०० जणांमध्ये विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यलय, पोलीस आयुक्तालय, शहरा लगतच्या ग्रामपंचायती, नामांकित हॉस्पिटल, पुणे कॅन्टोमेंट बोर्डमधील कार्यालय, सेंट्रल रेल्वेचे कार्यालय, विविध महाविद्यालये, शासकीय कार्यालय, महावितरण कार्यालय, बांधकाम व हॉटेल व्यावसायिक यांचा समावेश आहे. पाणीपट्टी थकल्यानंतर लगेच नळ कनेक्शन तोडण्याची तरतूद महापालिका अधिनियमामध्ये आहे. मात्र ही थकीत पाणीपट्टीची वसुली करण्याऐवजी त्याच व्यक्तींना पुन्हा नळकनेक्शन देण्यात आल्याचे प्रकार उजेडात आले आहे.
याबाबात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले, ‘‘महापालिकेकडून मीटरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता, त्या वेळी काही जणांची पाणीपट्टीची रक्कम थकली आहे. ही थकबाकीदारांची यादी मिळकत विभागाला देण्यात आली आहे, त्यांच्या मदतीने ती वसूल केली जाणार आहे. त्याचबरोबर ही थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा विचार केला जात आहे.’’

Web Title: 300 crores of water torn by tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.