३०५ सी.सी.इंजिन अन १० अश्वशक्तीची मॉडेल कार
By admin | Published: September 16, 2016 02:01 AM2016-09-16T02:01:09+5:302016-09-16T02:01:09+5:30
नाशिक येथील गोदावरी नदीकाठी सन २०१७ मध्ये होऊ घातलेल्या ‘आॅल टर्म व्हेकल’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरिता स्थानिक पी.आर.पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या
अमरावती : नाशिक येथील गोदावरी नदीकाठी सन २०१७ मध्ये होऊ घातलेल्या ‘आॅल टर्म व्हेकल’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरिता स्थानिक पी.आर.पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ३०५ सीसीचे इंजिन आणि १० अश्वशक्तीच्या मॉडेल कारच्या आभासित ढाच्याचे यशस्वी सादरीकरण करून एक मोठा टप्पा गाठला आहे. अभियंतादिनी या महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.
मागील वर्षी चंदीगढ येथे झालेल्या आभासी ढाच्याच्या सादरीकरण फेरीत या चमुने त्यांच्या पात्रतेवर शिक्कामोर्तब केले होते. या मॉडेल कारवर मागील सहा महिन्यांपासून विद्यार्थी व प्राध्यापकांची चमू कठोर परिश्रम घेत होती. ७ फूट ३ इंच लांब व ५ फूट २ इंच इतकी उंच अशी ही कार तयार करण्यात आली आहे. ही कार कोणत्याही रस्त्यावर वा पृष्ठभागावर सहजरीत्या धावू शकते. विशेष म्हणजे या कारचे वजन २९० किलोमीटर इतके असून त्याचे इंजिन मागील बाजूस बसविण्यात आले आहे. या कारचा ढाचा तयार करण्याकरिता मेटॅलिक पाईपचा वापर करण्यात आला आहे. एक रिव्हर्ससह पाच गिअर या कारला बसविण्यात आले आहेत.
या मॉडेल कारच्या यशस्वी निर्मितीकरिता विभागप्रमुख एस.जी.फाले यांचे मार्गदर्शन लाभले. एस.जे.देशमुख यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यशाळेत सहभागी एकूण १२ विद्यार्थ्यांनी ही कार तयार करण्याकरिता प्रयत्न केलेत्. (प्रतिनिधी)