३०० शिक्षकांवर ‘कलम ३०७’

By admin | Published: October 6, 2016 05:45 AM2016-10-06T05:45:55+5:302016-10-06T06:13:32+5:30

मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी तब्बल ३०० शिक्षकांविरुद्ध कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) आणि दंगलीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले

'307' for 300 teachers | ३०० शिक्षकांवर ‘कलम ३०७’

३०० शिक्षकांवर ‘कलम ३०७’

Next

औरंगाबाद : मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी तब्बल ३०० शिक्षकांविरुद्ध कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) आणि दंगलीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून, ५९ शिक्षकांना अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मंगळवारी औरंगाबादेतील मंत्रिमंडळाच्या बैठकीवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात राज्यभरातील शिक्षक मंडळी सहभागी झाली होती. महिला शिक्षकांची उपस्थितीही लक्षणीय होती. मात्र, या मोर्चाला हिंसक वळण लागून २१ शिक्षक आणि १३ पोलीस जखमी झाले. पोलिसांनी बळाचा वापर करत, शिक्षकांवर लाठीमार केला, असा आरोप कृती समितीने केला आहे, तर आंदोलनकर्त्यांनी अर्वाच्च भाषा वापरत, पोलिसांवर दगडफेक केल्याने जमावाला पांगविण्यासाठी सौम्य बळाचा वापर करावा लागला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
आंदोलकांवर नोंदविले गंभीर गुन्हे
या घटनेनंतर औरंगाबाद पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेत, विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह तब्बल तीनशे शिक्षकांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविले. यामध्ये कलम ३०७ ( खुनाचा प्रयत्न करणे), ३५३ (सरकारी कामात अडथळा निर्माण करणे) यासह दंगलीचे कलम ३३३, ३३६, ३३७, १४३, १४७, १४८, १४९ भादंविसह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा कायदा १९८४ चे कलम ३ व ४ व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट १९३२ चे कलम ७ सह कलम १३५ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या सर्व कलमांन्वये कोर्टात गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना मोठी शिक्षा होऊ शकते.
................
४७ शिक्षकांची हर्सूल कारागृहात रवानगी
सर्व आरोपी शिक्षकांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने १२ पदाधिकाऱ्यांना १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तर ४७ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. त्या ४७ जणांची रात्री उशिरा हर्सूलमध्ये रवानगी करण्यात आली. या शिक्षकांमध्ये राहुल भोसले (रा. बेलोरो, जाफराबाद, जालना), भास्कर कड (रा. जाफराबाद, जालना), गणेश शेळके (रा. बेलोरोे, जालना), शंकर उर्किडे (रा. टेंभुर्णी, जालना), सुदेश मोरे (रा. सुंदरखेड, बुलडाणा), सुनील दुमाने (रा. वसमत, हिंगोली), सिद्धार्थ कोंगराव (रा. दैठणा, परभणी), तुकाराम कदम (रा. संतसेनानगर, परभणी), गजानन देशमुख (रा. परभणी), मुंजाजी शिंदे (रा. धसाडी, परभणी), विलास आवारे (रा. चिखली, आष्टी, बीड), अर्जुन पाखरे (रा. रांजणगाव, औरंगाबाद), शेख मुबीन (रा. मुदखेड, नांदेड), शेख इर्शाद (रा. लोणार, बुलडाणा), इरफान खान (रा. रिसोड, वाशिम), शेख नय्युम (रा. वाघी, वाशिम), अर्जुन पळसकर (रा. पळशी, औरंगाबाद), सईद खान (रा. रिसोड, वाशिम), मोहंमद नदीम (रा. वाशिम), लक्ष्मण घ्यार (रा. शेणगाव, हिंगोली), संतोष राठोड (रा. जांभळी, भोकर, नांदेड), सुरेश गवळी (रा. सिडको, औरंगाबाद), चतुर्भुज लोकरे (रा. बेगळी, उस्मानाबाद), महादेव पट्टे (रा. काकरंबा, तुळजापूर), प्रवीण काळे (रा. पुंडलिकनगर, औरंगाबाद), विलास घोंगे (रा. देऊळगाव राजा, बुलडाणा), रामेश्वर पवार (रा. आसेगाव, रिसोड, वाशिम), अनिल भावसार (रा. शिंगापूर, अक्कलकुवा, नंदुरबार), विजय द्वारकुंडे (रा. जयभवानीनगर, औरंगाबाद), गणेश पवार (रा. आनंदनगर, औरंगाबाद), श्रीकांत गरुड (रा. वरखेड, पालम, परभणी), संतोष देशमुख (रा. केज, बीड), रंगनाथ भोपळे (रा. जाफराबाद, जालना), भरत शेळके (रा. देऊळगाव राजा, बुलडाणा), सुभराव पवार (रा. बोरगाव, केज, बीड), संदीप किरतकर (रा. पाथूर, अकोला), संदीप पवार (रा. ननासी, दिंडोरी, नाशिक), अनिल पगार (रा. ननासी, नाशिक), अमर पाटील (रा. जयसिंगपूर, कोल्हापूर), भाऊसाहेब काळे (रा. सिडको, औरंगाबाद), सचिन पाचबोले (रा. पातूर, अकोला), आदिनाथ अडसरे (रा. रांजणगाव, औरंगाबाद), रमेश उकर्डे (रा. टेंभुर्णी, जालना), मच्छिंद्र जाधव (रा. शिरोळ, कोल्हापूर), प्रदीप कोळी (रा. शिरोळ, कोल्हापूर), नीलेश गरुड (रा. विराणे, मालेगाव), कैलास पाबळे (पानेवाडी, जालना) या शिक्षकांचा समावेश आहे.
.....................
अटकेत असलेले पदाधिकारी
सीताराम म्हसकर (रा. मापोडा, खालापूर, राजगड), मनोज पाटील (रा. बालजीनगर, औरंगाबाद), खंडेराय जगदाळे (रा. शिरोळ, कोल्हापूर), शिवराम म्हस्के (रा. बोरसर, कन्नड, औरंगाबाद), वाल्मीक सुरासे (रा. तिरुपती पार्क, सिडको, औरंगाबाद), रवींद्र मंडावर (रा. वैजापूर, औरंगाबाद), मिर्झा सलीम बेग (रा. सादातनगर, औरंगाबाद), अन्सारी मोहंमद जावेद (रा. लेबर कॉलनी परिसर, औरंगाबाद), अभिजित कदम (रा. पूर्णा, परभणी), रमेश देशमुख (रा. पाथरी, परभणी), संदीप देवरे (रा. गारखेडा, भोकरदन, जालना), दीपक इंगळे (रा. सातगाव, म्हसला, बुलडाणा) या १२ पदाधिकाऱ्यांना न्यायालयाने १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, तर अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

Web Title: '307' for 300 teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.