पवार, तटकरेंच्या ३०८ बोगस कंपन्या
By admin | Published: October 24, 2015 03:53 AM2015-10-24T03:53:12+5:302015-10-24T03:53:12+5:30
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी ३०८
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदा
मंत्री सुनील तटकरे यांनी ३०८
बोगस कंपन्या स्थापन करून ८०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला, असा आरोप भाजपाचे मुंबईतील खासदार किरीट सोमय्या यांनी आज पत्रपरिषदेत केला.
तर राज्यातील भाजपा सरकारवर भ्रष्टाचाराचे नवनवे आरोप होत असताना त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी हे बिनबुडाचे आरोप सोमय्या करीत असल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. सोमय्या यांनी आरोप केला की, तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील कोंढाणे धरण प्रकल्पाला एका दिवसात परवानगी देताना निविदेची किंमत ५८ कोटी रुपयांवरून ४०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली.
हे कंत्राट एफए कन्स्ट्रक्शनला देण्यात आले. या कंत्राटदाराने नेत्यांना लाच देण्यासाठी युनियन बँकेतून ८०० कोटी रुपये काढल्याचे माहिती अधिकारातून पुढे आले आहे. हे ८०० कोटी पचवण्यासाठी कोट्यवधीची बोगस बिले सादर करण्यात आली. तसेच कोंढाणे धरणाची किंमत ही वारंवार वाढवल्याचा दावाही सोमय्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
भाजपा सिंचन प्रकल्पावरून मीडिया ट्रायल करीत आहे. सोमय्या यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी ती माहिती तपासयंत्रणांना दिली पाहिजे, सरकार त्यांचेच आहे. काय चौकशी करायची त्यांनी करावी, परंतु केवळ स्टंटबाजी करणे सोडून द्यावे.
- नवाब मलिक, राष्ट्रवादी प्रवक्ते