औरंगाबादेत पकडले 31 लाखांचे मोबाईल
By admin | Published: September 20, 2014 02:13 AM2014-09-20T02:13:58+5:302014-09-20T02:13:58+5:30
फुलंब्री-सिल्लोड रस्त्यावरील खामगाव फाटय़ावर शुक्रवारी निवडणूक भरारी पथकाने सुमारे 31 लाख रुपये किमतीचे मोबाइल जप्त केले.
Next
औरंगाबाद : फुलंब्री-सिल्लोड रस्त्यावरील खामगाव फाटय़ावर शुक्रवारी निवडणूक भरारी पथकाने सुमारे 31 लाख रुपये किमतीचे मोबाइल जप्त केले.
औरंगाबादहून जळगावकडे जाणा:या या मारुती कारमधून तब्बल 3क् लाख 94 हजार रुपये किमतीचे एकूण एक हजार 38क् मोबाईल घेऊन जात असताना ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी चालक व मालक विनोद पाटील यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर देशमुख यांनी दिली.
कन्नडमध्येही कारवाई
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या गस्ती पथकाने गुरुवारी चाळीसगावकडून औरंगाबादकडे जाणा:या कारची हिवरखेडा नाक्याजवळ तपासणी केली असता 2 लाख 4क् हजार रुपये आढळले. या रकमेबाबत समाधानकारक खुलासा न झाल्याने पोलिसांनी ताब्यात घेतली.