३१० गावांत साजरा होणार योग दिन
By admin | Published: June 20, 2016 09:58 PM2016-06-20T21:58:05+5:302016-06-20T21:58:05+5:30
मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या राज्यातील ३१० गावांमध्ये मंगळवारी, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार
ऑनलाइन लोकमत,
मुंबई, दि. 20 - मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या राज्यातील ३१० गावांमध्ये मंगळवारी, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून १५ ते २१ जून या आठवड्यात २१० विद्यार्थ्यांसाठी विशेष योग शिबिराचे आयोजनही केले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाने कैवल्यधाम यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यानगरी येथील क्रीडा संकुलात योग शिबिराचे आयोजन केले आहे. विद्यानगरीमध्ये आयोजित या कार्यक्रमात प्रशिक्षित शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे योग प्रात्यक्षिक अनुभवयाला मिळणार आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती विद्यासागर राव हे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. याआधी विद्यापीठाने २३ ते २९ मे २०१६ या कालावधीत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील १०० शिक्षकांना एक आठवड्याचे योग प्रशिक्षण दिले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयामध्ये ३ दिवसाचे योग प्रशिक्षण देण्यात येत आहे.