लोकवर्गणीतून उभारले 318 बंधारे

By admin | Published: August 3, 2014 01:39 AM2014-08-03T01:39:12+5:302014-08-03T01:39:12+5:30

माणसाची इच्छाशक्ती असेल तर तो काय करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्यात राहणारे हेमंत जगताप

318 bunds set up in the Lok class category | लोकवर्गणीतून उभारले 318 बंधारे

लोकवर्गणीतून उभारले 318 बंधारे

Next
अजित मांडके - ठाणो
माणसाची इच्छाशक्ती असेल तर तो काय करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्यात राहणारे हेमंत जगताप. ठाणो जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी या माणसाने जिवाचे रान करून जिल्ह्याच्या विविध भागांत आतार्पयत 318 बंधारे उभारले आहेत. यामुळे मुरबाड, वसई, जव्हार, वाडा, मोखाडा, पालघर, डहाणू, विक्रमगड, तलासरी आदी भागांतील शेकडो कुटुंबांची तहान भागवण्याबरोबरच शेतीसाठी पाणी, रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम या अवलियाने केले आहे. त्यांच्या या एका ध्येयामुळे या भागातील शेतक:यांना आता दिलासा मिळाला आहे.
ठाणो पूर्व येथे राहणारे जगताप सध्या सार्वजनिक बांधकाम विभागात उपविभागीय अभियंता या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा केवळ रस्ते, पूल आदी कामांशी संबंध येतो. परंतु, 1993-94च्या सुमारास त्यांची बदली वाडा येथे झाली असता, येथील भागात काम करीत असताना येथील गावपाडय़ांत असलेल्या पाण्याची समस्या त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर, त्यांनी या समस्याग्रस्त गावपाडय़ांची तहान भागवण्यासाठी पावले उचलली. एप्रिल-मे महिन्यांत पहिला बंधारा उभारला. यासाठी त्यांनी सुरुवातीला हा प्रस्ताव सामाजिक वनीकरण विभागापुढे ठेवला. शासनाच्या योजनेची माहिती घेतली. त्यानंतर, त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचे डिझाइन केले, परंतु निधीची उभारणी कशी करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अखेर, 85 हजारांचा निधी लोकवर्गणीतून आणि उर्वरित 1 लाखांचा निधी विविध संस्थांच्या माध्यमातून उभा करून त्यांनी वाडय़ातील नेहरुली गावात पहिला 14 मीटर लांबीचा बंधारा उभारला अन् येथूनच त्यांच्या कार्याला ख:या अर्थाने सुरुवात झाली. पुढे त्यांनी हे कार्य सुरू ठेवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या. परंतु, निधी उभारणो त्यांना एकटय़ाला शक्य नव्हते. याच काळात म्हणजे 1999मध्ये ते रोटरीचे सदस्य झाले आणि या माध्यमातून त्यांनी आपले कार्य पुढे नेण्याचे निश्चित केले. त्यानंतर, त्यांनी लार्सन अॅण्ड टुबरेच्या ट्रस्टपुढे बंधा:याचे सादरीकरण केले. तसेच जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली.  ट्रस्टला जगताप यांनी केलेले सादरीकरण आवडले आणि त्यांनी जिल्ह्यात आणखी बंधारे उभारण्यासाठी 7 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. 
त्यानंतर, जगताप यांची खरी कसोटी लागणार होती. परंतु, रोटरीची मिळालेली साथ आणि आपल्यातील ध्येयामुळे त्यांनी या संधीचे सोने करायचे ठरवले. याच माध्यमातून त्यांनी 2क्क्6-क्7 या एका वर्षात जिल्ह्यात 14 बंधारे उभारले. यामध्ये डहाणूच्या सहा बंधा:यांचा समावेश होता. त्यानंतर, 2क्क्8-क्9 नंतर या कामात मदत वाढवण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या. विविध सामाजिक संस्था, ट्रस्ट यांच्यापुढे बंधा:यांचे सादरीकरण करून त्यांना या कामात यश आले. यातून त्यांना भरघोस निधी उपलब्ध होत गेला. त्यातूनच, त्यांनी 15क् बंधारे उभारण्याचा दृढ निश्चिय केला. परंतु, एक बंधारा बांधण्याचा खर्च चार ते साडेचार लाखांच्या घरात गेला होता. शासकीय बंधा:यांच्या तुलनेत हा खर्च कमीच होता. शासकीय बंधारा हा दगड आणि मातीचा होता. आता त्यांनीसुद्धा सिमेंट काँक्रीटचे बंधारे उभारण्यास सुरुवात केली असली तरी त्याचा खर्च अधिक आहे. परंतु, जगताप यांच्या संकल्पनेतून तयार झालेला बंधारा हा सिमेंट काँक्रीटचा असल्याने त्याचे आयुर्मानदेखील 5क् वर्षाचे असून, तो कमी खर्चात उभारता येत आहे. तसेच छोटय़ा स्वरूपात असलेले हे बंधारे बांधताना ते 1क्क् ते 15क् मीटरवर उभारल्याने त्याचा फायदादेखील आजूबाजूच्या बहुसंख्य पाडय़ांना झाला आहे. त्यामुळे त्यांच्या संकल्पनेचे सर्वच स्तरांतून कौतुक झाले. सुरुवातीला त्यांना या कामात शेतक:यांचा काहीसा विरोध झाला. परंतु, शेतक:यांना होत असलेला फायदा लक्षात आणून देण्यासाठी त्यांनी रोटरीमधील सहका:यांच्या मदतीने शाळा, गावपाडे येथे जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली. हे काम त्यांना एकटय़ाला शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रत्येक गावपाडय़ात स्थानिक कार्यकत्र्याच्या फळ्या उभ्या केल्या. त्यांना याची माहिती करून दिली. सुरुवातीला कुठे बंधारा उभारायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे असायचा. परंतु, कार्यकत्र्याच्या फळीमुळे त्यांची ही समस्यासुद्धा सुटली आणि त्यांनी 2क्क्5 ते आतार्पयत जिल्ह्यातील डहाणू, पालघर, मुरबाड, जव्हार, वाडा,  विक्रमगड, तलासरी आदींसह इतर भागांत तब्बल 318 बंधारे उभारले आहेत. जिथे मागणी आहे, तेथेच बंधारा बांधायचा, असे निश्चित केल्याने ज्या गावपाडय़ांना पाण्याची नितांत गरज आहे, त्यांना त्याचा उपयोग झाला आहे. 
 
बंधा:यांमुळे आता दुबार पीक घेण्यास मदत झाली आहे, तसेच दूरवर पाणी आणण्यासाठी न जाता ते आता गावातच उपलब्ध झाले आहे.
- रमेश भोईर, शेतकरी, पोटगाव
बंधारा नव्हता, तेव्हा 5क्क् फूट खोल खोदूनही बोअरवेलला पाणी लागले नव्हते. परंतु आता बंधा:यांमुळे 2क् फुटांवरच पाणी लागल्याने त्याचे समाधान आहे.
- बाळू भोईर, सरपंच, बरडपाडा
 
एका बंधा:याचे पाणी शेतीसाठी, पिण्यासाठी आणि गुरांना पिण्यासाठी उपलब्ध होत असून, दुबार पिकांसाठीसुद्धा याचा फायदा होत आहे. यामुळे एका वेळेस 15 ते 2क् एकर जमीन आता ओलिताखाली आणता येते. तसेच यातील गाळ हा शेतीत खत म्हणूनही उपयोगात येत असून, यातून मिळणा:या वाळूतून उत्पन्नाचे एक साधनही शेतक:यांना उपलब्ध झाले आहे. या बंधा:यांची निगा देखभालीची जबाबदारी ही स्थानिक शेतक:यांवर सोपवण्यात आली आहे.
 
मुरबाड तालुक्यातील आसोसे या गावाची लोकसंख्या ही 55क् च्या घरात आहे. परंतु, येथे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचीही समस्या होती. विशेष म्हणजे, बोअरवेलला 5क्क् फूट खोल खोदूनही पाणी लागत नव्हते. महिलावर्गाला 2 किमी चालत जाऊन पिण्याचे पाणी आणावे लागत होते. 
परंतु, मागील वर्षी येथे बंधारे उभारल्याने त्याचा एका वर्षात येथील रहिवाशांना फायदा झाला आहे. येथील शेतक:यांना आता हाकेच्या अंतरावरच पिण्याचे पाणी उपलब्ध झाले असून, 2क् फुटांवर बोअरवेलला पाणी लागले आहे. तसेच येथील शेतकरी आता दुबार पीक घेऊ लागले आहेत. त्यामुळे येथील शेतक:यांच्या चेह:यावर एक वेगळेच समाधान दिसून आले. 
एका बंधा:याचा 6क्क् ते 8क्क् कुटुंबांना फायदा होत असून, 
25 ते 3क् लाख लीटर पाणी या बंधा:यात उपलब्ध होत आहे. यातील 15 ते 2क् टक्के पाणी हे जमिनीत मुरते, 24 टक्के पाणी बाष्पीभवन आणि उर्वरित 5क् ते 65 टक्के पाणी वापरात येत आहे. 

 

Web Title: 318 bunds set up in the Lok class category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.