पतसंस्थांचे ३२ हजार कोटी अडकले
By admin | Published: November 12, 2016 03:19 AM2016-11-12T03:19:58+5:302016-11-12T03:19:58+5:30
केंद्र सरकारने पाचशे व एक हजार रुपये मूल्याच्या नोटा बाद केल्यानंतर सहकारी पतसंस्थांचे सुमारे ३२ हजार कोटी रुपये विविध बँकांमध्ये अडकून पडले आहेत
मिलिंदकुमार साळवे, अहमदनगर
केंद्र सरकारने पाचशे व एक हजार रुपये मूल्याच्या नोटा बाद केल्यानंतर सहकारी पतसंस्थांचे सुमारे ३२ हजार कोटी रुपये विविध बँकांमध्ये अडकून पडले आहेत. पतसंस्थांना हजार व पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास मनाई केल्याने व्यवहार ठप्प आहेत.
राज्यात १५ हजार ६७० सहकारी पतसंस्था असून, त्याद्वारे २२ हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तर ३२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. हा सर्व पैसा जिल्हा सहकारी बँकांसह विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवला आहे. तर पतसंस्थांचे राष्ट्रीयीकृत बँकांमधील पैसे त्यांना रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेमुळे काढता येत नाहीत, असे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी सांगितले.