३२ वर्षांच्या लढ्याने माळरानावर फुलली हिरवळ!

By admin | Published: April 3, 2016 03:51 AM2016-04-03T03:51:14+5:302016-04-03T03:51:14+5:30

धरणामुळे एका गावाचे पुनर्वसन करावे लागले आणि कधीकाळी सुखी-संपन्न असलेल्या या गावाला बकाल स्वरूप प्राप्त झाले. मात्र परिस्थितीसमोर हतबल न होता; या ग्रामस्थांनी अनंत अडथळ्यांची

32 years of struggle with a sparkling green tree! | ३२ वर्षांच्या लढ्याने माळरानावर फुलली हिरवळ!

३२ वर्षांच्या लढ्याने माळरानावर फुलली हिरवळ!

Next

- अनिल गवई, खामगाव (बुलडाणा)
धरणामुळे एका गावाचे पुनर्वसन करावे लागले आणि कधीकाळी सुखी-संपन्न असलेल्या या गावाला बकाल स्वरूप प्राप्त झाले. मात्र परिस्थितीसमोर हतबल न होता; या ग्रामस्थांनी अनंत अडथळ्यांची शर्यत पार करून, तब्बल ३२ वर्षांनंतर २५० एकर माळरानावर हिरवळ फुलवली.
ही यशोगाथा आहे, पिंपरी धनगर येथील ग्रामस्थांनी दिलेल्या सामूहिक लढ्याची. १९८७-८८ साली मन प्रकल्पाचे काम सुरू झाले, त्यावेळी पिंपरी धनगर हे गाव या प्रकल्पाच्या पात्रात येत असल्यामुळे गावाचे जलाशयापासून ६०० मीटर अंतरावर पुनर्वसन करण्यात आले. सधन आणि सुखसंपन्न गावाच्या इतिहासाला त्याचवेळी जलसमाधी मिळाली. पुनर्वसित ठिकाणी पाणी नसल्यामुळे शेती पिकत नव्हती. त्यामुळे काहींनी गाव सोडले.
वस्तुत: मन प्रकल्पातील सहा टक्के जलसाठा पुनर्वसित गावासाठी आरक्षित असताना केवळ प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे जलाशयाचे पाणी त्यांना मिळत नव्हते. त्यामुळे हळूहळू आंदोलन उभे राहीले. या लढ्यामुळे १६ मे तसेच २६ डिसेंबर २०१३ आणि २५ जानेवारी २०१४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत विविध प्रशासकीय मान्यतांचे प्रश्न मार्गी लागले. त्यामुळे प्रिंपी धनगर येथील ग्रामस्थांना जलाशयातील पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर जानेवारी २०१६च्या पहिल्या आठवड्यात प्रिंपी येथील २७ शेतकऱ्यांना जलाशयाचे पाणी मिळाले. पाण्याचा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांनी कांदा, भुईमूग आणि गव्हाचे उत्पादन घेतले. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काही शेतकऱ्यांना उत्पादन मिळाले असून, अनेकांच्या शेतात कांद्याचे पीक बहरत आहे.

गोवऱ्या वेचणाऱ्या
हातांना मिळाला रोजगार!
शेती पिकत नसल्यामुळे या भागातील अनेक नागरिकांनी गावातून स्थलांतर केले होते. काहींनी माळरानावरील गोवऱ्या वेचून त्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला; मात्र आता तब्बल २५० एकर जमीन ओलिताखाली आल्याने ग्रामस्थांना रोजगार मिळाला आहे.

वनविभागाकडे एक लाखाचा भरणा!
लोकवर्गणीतून पिंप्री धनगरवासीयांनी वन विभागाकडे १ लाख दहा हजार रुपयांचा भरणा केला. वृक्ष लागवडीसाठी आता हे गावकरी धडपडत आहेत.

अनेक वर्षांपासून ओस पडलेल्या माळरानावर ३२ वर्षांनंतर हिरवळ फुलली आहे. या आंदोलनाला यश आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे.
- आशाताई सुनील जाधव, सरपंच, पिंप्री धनगर, खामगाव

Web Title: 32 years of struggle with a sparkling green tree!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.