पावसाळापूर्व उपायांवर ३२१ कोटींचा खर्च

By admin | Published: May 31, 2016 06:15 AM2016-05-31T06:15:21+5:302016-05-31T06:15:21+5:30

प्रत्येक वर्षी कोकण रेल्वेकडून पावसाळापूर्व सुरक्षेच्या उपाययोजना रेल्वेमार्गांवर केल्या जातात. तरीही कोकण रेल्वेला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसतो आणि कोकण रेल्वे विस्कळीत होते.

321 crores spent on rains before remedies | पावसाळापूर्व उपायांवर ३२१ कोटींचा खर्च

पावसाळापूर्व उपायांवर ३२१ कोटींचा खर्च

Next

मुंबई : प्रत्येक वर्षी कोकण रेल्वेकडून पावसाळापूर्व सुरक्षेच्या उपाययोजना रेल्वेमार्गांवर केल्या जातात. तरीही कोकण रेल्वेला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसतो आणि कोकण रेल्वे विस्कळीत होते. गेल्या १७ वर्षांत कोकण रेल्वेने पावसाळापूर्व सुरक्षा उपाययोजनांवर ३२१ कोटी रुपये खर्च केल्याचे कोकण रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यास यंदाही कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. जवळपास ९५0 कर्मचारी तैनात करण्याबरोबरच मुसळधार पावसात कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या ट्रेनना ताशी ४0 किमीची वेगमर्यादा देण्यात आली आहे. कोकण रेल्वेमार्गावर प्रत्येक वर्षी दरड कोसळणे, माती खचणे, पाणी साचण्याच्या घटना घडतात आणि मोठा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसतो. पोमेंडी, निवसर, अडवलीसारखी ठिकाणे तर कोकण रेल्वेसाठी डोकेदुखीच ठरली आहे. या ठिकाणी तर भूसख्खलनामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडतात. मात्र गेल्या चार वर्षांत कोणतीही दुर्घटना घडली नसून उपाययोजनांमुळे पावसाळ्यात सुरळीतपणे ट्रेन धावल्याचे कोकण रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पावसाळापूर्व सुरक्षा उपाययोजनेसाठी कोकण रेल्वेमार्गावर यंदा ४ कोटी ५८ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तर २0१४-१५मध्ये हाच खर्च ८ कोटी १७ लाख रुपये एवढा होता. मागील १७ वर्षातील खर्च ३२१ कोटी ७0 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 321 crores spent on rains before remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.