३,२२८ शेतकऱ्यांची महाराष्ट्रात आत्महत्या

By admin | Published: March 5, 2016 02:55 AM2016-03-05T02:55:16+5:302016-03-05T02:55:16+5:30

मागील २०१५ या वर्षात महाराष्ट्रात किमान ३,२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या १४ वर्षांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा हा उच्चांक आहे

3,228 farmers suicides in Maharashtra | ३,२२८ शेतकऱ्यांची महाराष्ट्रात आत्महत्या

३,२२८ शेतकऱ्यांची महाराष्ट्रात आत्महत्या

Next

नवी दिल्ली : मागील २०१५ या वर्षात महाराष्ट्रात किमान ३,२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या १४ वर्षांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा हा उच्चांक आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले.
शेतीला व्यवहार्य बनविणे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारे विविध योजना राबवीत आहेत, असे ते म्हणाले. ‘महाराष्ट्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या वर्षभरात ३,२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि २००१ पासूनचा आत्महत्यांचा हा उच्चांक आहे,’ असे सिंह यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
महाराष्ट्रातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून ३०४९.३६ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवीत आहे, असेही कृषिमंत्री सिंह यांनी सांगितले.
१२ लाख हेक्टर शेतजमिनीचा वापरच नाही
देशात १२ लाख हेक्टर शेतजमीन कुठल्याही वापराशिवाय पडली असून विविध राज्यांमध्ये पट्टे देण्यासंदर्भात असलेले स्वतंत्र कायदे हे यामागील एक मुख्य कारण असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.
कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी राज्यसभेत हा खुलासा केला. शेतीयोग्य जमीन कंपन्या आणि उद्योगांना दिली जाण्याची शंका विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केली होती. या शंकांचे निरसन करताना या बैठकीचे उद्योगांशी काहीही देणेघेणे नसल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)महाराष्ट्राच्या अमरावती विभागात सर्वांत जास्त म्हणजे १,१७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्या खालोखाल औरंगाबाद विभागात १,१३०, नाशिक विभागात ४५९, नागपूर विभागात ३६२, पुणे विभागात ९६ आणि कोकण विभागात २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.३,२२८ पैकी १,८१९ प्रकरणे अनुदानास पात्र
या ३,२२८ आत्महत्या प्रकरणांपैकी १,८४१ प्रकरणे सानुग्रह अनुदानास पात्र ठरली आहेत, तर ९०३ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. ४८४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत, अशी माहिती सिंह यांनी दिली.

Web Title: 3,228 farmers suicides in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.