३३ कोटी वृक्षलागवडीची होणार चौकशी: वन राज्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 08:16 AM2022-03-22T08:16:04+5:302022-03-22T08:16:15+5:30
अपक्ष सदस्य किशोर दराडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
मुंबई: पंढरपूर तालुक्यातील १६ गावांमध्ये वृक्ष लागवडीतील भ्रष्टाचारप्रकरणी तत्कालीन वनक्षेत्रपाल किशोर अहिरे यांना निलंबित करण्याची घोषणा वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी विधान परिषदेत केली.
अपक्ष सदस्य किशोर दराडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या योजनेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील १६ गावांमध्ये वृक्षलागवड करत असताना संबंधित वनक्षेत्रपाल आणि कायम वनमजूर या दोघांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दराडे यांनी केला. यावर, राज्यमंत्री भरणे म्हणाले की, सहायक वनरक्षकांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. आरोपांचे गांभीर्य पाहता तत्कालीन वनक्षेत्रपाल किशोर अहिरे यांना निलंबित करण्यात येत असल्याचो भरणे यांनी स्पष्ट केले.
राज्यात २०१८ ते २०२० या कालावधीत राज्य सरकारच्या ३३ कोटी व १३ कोटी वृक्षलागवड योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी वन राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करून अहवाल सादर करेल, अशी माहिती भरणे यांनी दिली.