खासगी बाजारात ३३ लाख क्विंटल कापूस खरेदी!

By admin | Published: November 14, 2015 02:11 AM2015-11-14T02:11:25+5:302015-11-14T02:11:25+5:30

सलग पाच दिवस शासकीय सुटी पणन महासंघाची कापूस खरेदी बंद आहे.

33 lakh quintals of cotton in private market! | खासगी बाजारात ३३ लाख क्विंटल कापूस खरेदी!

खासगी बाजारात ३३ लाख क्विंटल कापूस खरेदी!

Next

अकोला: राज्यात खरीप हंगामातील कापसाची मोठी आवक सुरू झाली; परंतु महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने मोजकीच कापूस खरेदी केंद्रे सुरू केली असून, भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अद्याप कापूस खरेदी सुरू केली नाही. सलग पाच दिवस शासकीय सुटी असल्याने पणन महासंघाची कापूस खरेदी बंद आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्याकडील कापूस खासगी बाजारात कमी अधिक दरात विकावा लागत आहे. खासगी बाजारात राज्यात आजमितीस ३३ लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. कापूस नगदी पीक असून, कापसाचा हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. ऐन दसरा-दिवाळी सणाच्या मुहूर्तावरच हा कापूस हंगाम सुरू होत असल्याने शेतकर्‍यांची हाती कापूस विक्रीचा पैसा येतो, त्यामुळे या सणाचा आनंद व्दिगुणित होतो. यावर्षी पणन महासंघाने दिवाळीपूर्वी २0 कापूस खरेदी केंद्र सुरू केली आहेत, असे असली तरी ही केंद्र मोजक्याच काही जिल्हय़ांच्या ठिकाणी असल्याने यावर्षी शेतकर्‍यांना कापूस विक्रीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना खेडा खरेदीदार व खासगी बाजारात कमी अधिक दरात कापूस विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. भारतीय कापूस महामंडळानेदेखील यावर्षी कापूस खरेदी केंद्र सुरू केली नाहीत. दरम्यान, मागील वर्षी ४0५0 रुपये हमीदर होते. तथापि, या दरापेक्षा कमी दराने खासगी बाजारात कापसाची खरेदी करण्यात आली. यावर्षी हमीदर ४१00 रुपये प्रतिक्विंटल आहेत. सध्या खासगी बाजारात कापसाची प्रत बघून शेतकर्‍यांचा कापूस खरेदी केला जात आहे. त्यामुळे खासगी बाजारात कापसाच्या हवी तेवढी वृद्धी नाही तथापि शेतकर्‍यांना सणासुदीसाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी खासगी बाजारात कापसाची विक्री करीत आहेत. केंद्र सुरू केले तेव्हापासून १0 नोव्हेंबरपर्यंत पणन महासंघाने वाशिम जिल्हय़ातील कारंजा खरेदी केंद्रावर ५00 क्विंटल कापूस खरेदी केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ एन पी हिराणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पणन महासंघाने सुरुवातीला कापूस क्षेत्र असलेल्या जिल्हय़ात जिल्हानिहाय २0 खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. दिवाळीनंतर तालुकानिहाय कापूस खरेदी केली जाईल. सीसीआयदेखील दिवाळीनंतर कापूूस खरेदी करणार असल्याचे सांगीतले. तर कापूस उद्योजक बंसत बाछुका यांनी खासगी बाजारात राज्यात जवळपास ३२.५0 लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. शेतकर्‍यांना हमीदरापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकर्‍यांचा कल खासगी बाजाराकडे असल्याचे सांगीतले.

Web Title: 33 lakh quintals of cotton in private market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.