दुष्काळ निवारणासाठी ‘जलसंपदा’कडून ३.३० कोटी
By admin | Published: May 25, 2016 02:54 AM2016-05-25T02:54:27+5:302016-05-25T02:54:27+5:30
जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुष्काळ निवारणासाठी ३ कोटी ३० लाख रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी दिले आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी
Next
मुंबई : जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुष्काळ निवारणासाठी ३ कोटी ३० लाख रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी दिले आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज हा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला. महाजन यांनी केलेल्या आवाहनानुसार कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन या निधीसाठी दिले. महाजन यांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन दिले. या वेळी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव इकबालसिंग चहल, लाभक्षेत्र सचिव शिवाजीराव उपासे, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग.दि. कुलथे, सरचिटणीस समीर भाटकर आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)