गोव्यात गुन्हे करुन ३३३ विदेशी भूमिगत ; २0८ नायजेरियन

By admin | Published: August 25, 2016 07:41 PM2016-08-25T19:41:47+5:302016-08-25T19:41:47+5:30

देश विदेशी पाहुण्यांसाठी नंदनवन ठरलेल्या गोव्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात ५८३ विदेशी नागरिकांनी वेगवेगळे गुन्हे केले त्यातील ३३३ जण अद्याप भूमिगत आहेत.

333 foreign underground; 208 Nigerian | गोव्यात गुन्हे करुन ३३३ विदेशी भूमिगत ; २0८ नायजेरियन

गोव्यात गुन्हे करुन ३३३ विदेशी भूमिगत ; २0८ नायजेरियन

Next

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 25 : देश विदेशी पाहुण्यांसाठी नंदनवन ठरलेल्या गोव्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात ५८३ विदेशी नागरिकांनी वेगवेगळे गुन्हे केले त्यातील ३३३ जण अद्याप भूमिगत आहेत. त्यांचा ठावठिकाणा लागलेला नसून यात २0८ जण नायजेरियन नागरिक आहेत, अशी धक्कादायक माहिती पोलिस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुन्हेगार विदेशी नागरिकांना स्थानबध्द केल्यास त्यांना ठेवण्यासाठी स्थानबध्दता केंद्र राज्यात नाही याची उणीव व्यक्त करताना अलीकडे आग्वाद किल्ल्याचा काही भाग अशा केंद्रासाठी देण्याची तयारी सरकारने दर्शविल्याचे त्यानी सांगितले.

साळगांव येथे अलीकडेच ओबे सन्नी (३६), आगुस्तिन आनेफो (३१) व जोशुआ इझे (३२) या तीन नायजेरियन नागरिकांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडील व्हिसा तसेच पासपोर्ट बोगस असल्याचे मुंबईतील इमिग्रेशन केंद्र तसेच नायजेरियाचे भारतातील उच्चायुक्त कार्यालय आणि भारताचे नायजेरियातील उच्चायुक्त कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर आढळून आले. हे तिघे सांगोल्डा येथे सरपंच नीळकंठ नाईक यांच्या घरात भाड्याने रहात होते. भाडेकरु ठेवताना मालकाने त्यांच्याकडून ह्यसीह्ण फॉर्म भरुन घ्यायचा असतो. या तिघांच्या ह्यसीह्ण फॉर्मवरुनच चौकशी केली असता त्यांचा गुन्हा आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी भादंसंच्या कलम ४६५, ४६८,४७१,४२0 कलमांखाली तसेच १९४८ च्या विदेशी नागरिक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे नोंदविले आहेत.

घरमालकांनी भाडेकरु ठेवताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच ह्यसीह्ण फार्म भरुन घ्यावेत. संशयास्पद हालचाली आढळून आल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे. साळगांवच्या प्रकरणात तिघांचेही येणे- जाणे वेळी, अवेळी असायचे. अनेकदा आठ-आठ दिवस ते गायब असायचे. या तिघांचा गुन्हेगारी प्रकरणांशी काही संबंध आहे का, याची शहानिशा केली जात आहे.

स्थानबध्दता केंद्रासाठी आग्वाद किल्ल्यात जागा
गुप्ता म्हणाले की, बेकायदा वास्तव्य करणाऱ्या विदेशींना पोलिस महत्प्रयासाने पकडतात परंतु त्यांची मायदेशी परत पाठवणी करेपर्यंत त्यांना ठेवण्यासाठी राज्यात स्थानबध्दता केंद्र नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन अनेक राज्यांनी अशी केंद्रे उघडलेली आहेत मात्र गोव्यात अजून असे केंद्र होऊ शकलेले नाही. खासकरुन आफ्रिकन खंडातून येणारे नागरिक आपली नावे, पत्ते खोटेच देतात. ते कुठल्या राष्ट्राचे आहेत याची अनेकदा खातरजमा होत नाही.

Web Title: 333 foreign underground; 208 Nigerian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.