यंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 05:58 AM2020-10-01T05:58:24+5:302020-10-01T05:58:52+5:30

सर्वेक्षणातील निष्कर्ष; कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची भीती

34% of parents don't miss school this academic year! | यंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच!

यंदाच्या शैक्षणिक वर्षात ३४ टक्के पालकांना शाळा नकोच!

Next

मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षात म्हणजे मार्च / एप्रिलपर्यंत सरकारने शाळा उघडू नयेत, असे मत देशातील ३४% पालकांनी मांडले. तर ३२% पालकांनी ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत शाळा न उघडण्याचा निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया दिली. ७% पालकांनी १ आॅक्टोबर, १२% पालकांनी १ नोव्हेंबर, तर ९% जणांनी १ डिसेंबरपासून शाळा उघडाव्यात, असे मत नोंदवले.

‘लोकल सर्कल’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातील हे निरीक्षण आहे. सप्टेंबरमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात याआधीही संस्थेने सर्वेक्षण केले होते. त्या वेळी २३% पालकांनी शाळा सुरू करण्यास पाठिंबा दिला होता. मात्र गेल्या काही दिवसांत वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे या आकडेवारीत ३% घट दिसून आली. काही राज्यांत अटी-शर्तींचे पालन करून शाळा सुरू करण्याच्या सूचना आहेत. मात्र देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पालकांच्या मनात धास्ती तसेच मुलांच्या सुरक्षेबाबत काळजी आहे. या सर्वेक्षणासाठी देशातील २१७ जिल्ह्यांतील १४ हजार ५०० पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. सरकार शाळा सुरू करण्यासंदर्भात पालकांच्या मतांच्या, प्रतिक्रियांचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊ शकेल यासाठी हा अहवाल राज्य आणि केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे.

Web Title: 34% of parents don't miss school this academic year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.