खड्ड्याने घेतला 34 वर्षीय तरूणाचा जीव
By admin | Published: August 13, 2016 04:10 PM2016-08-13T16:10:44+5:302016-08-13T19:53:50+5:30
टिटवाळा येथील अभिदर्शन गार्डन येथे वास्तव्यास असणारे विजय केंदे (34) यांचा खड्यात दुचाकी आपटून झालेल्या आपघात जागीच दूर्दैवी मृत्यू झाला
Next
>ऑनलाइन लोकमत -
खड्डयांमुळे जिव गेल्याने प्रशासनाविरूध्द नातेवाईकांतून नाराजीचा सूर
टिटवाळा, दि. 13 - येथील अभिदर्शन गार्डन येथे वास्तव्यास असणारे विजय केंदे (34) यांचा खड्ड्यात दुचाकी आपटून झालेल्या आपघात जागीच दूर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे केंदे कुटुंब दुखाच्या छायेत असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खड्यामुळे विजयचा जीव गेला असल्याने नातेवाईक प्रशासनास दोष देत आहेत.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, विजय हा घोडबंदर रोड, ठाणे येथे एचडीएफसी या बॅकेत असिस्टंट मॅनेजर या पदावर नोकरीस होता. बुधवारी नेहमीप्रमाणे विजय व त्याचा मित्र कामावरून निघाल्यानंतर दुचाकीवरून घरी निघाला होता. कल्याण भिवंडी बाय पास कोन रोडला रात्री 7.45 सुमारास येताच त्याची दुचाकी येथील खड्डयात आपटून खाली पडली. तितक्यात मागून येणारा गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक त्यांच्या डोक्यावरून गेला. हेल्मेटचा चक्काचूर होऊन त्याच्या डोक्यावर जबरी दुखापत होऊन विजयचा जागीच दूर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या सोबत असणारा मित्र बाजूला फेकला गेल्यामुळे किरकोळ जखमी होऊन सुदैवाने बचावला.
या संदर्भातचे वृत्त केंदे कुटुंबाला समजताच या घरात एकच आक्रोश सुरू झाला. विजयला 8 वर्षाचा मुलगा व पत्नी असे कुटूंब आहे. सदर घटना ही रस्त्यावरील खड्डयांमुळे घडली असल्याचे विजयच्या नातेवाईकांतून बोलले जाते. या घटनेला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. रस्त्यावरील खड्डे वेळेवर बुजले असते तर आज विजयला आपला जीव गमवावा लागला नसता. आता तरी प्रशासनाने रस्त्यावर असणारे खड्डे बुजवून काढावेत अशी मागणी लोक करत आहेत .