34,500 कोटी खचरून दुष्काळमुक्त महाराष्ट्र
By admin | Published: December 12, 2014 01:55 AM2014-12-12T01:55:38+5:302014-12-12T01:55:38+5:30
राज्य येत्या पाच वर्षात पूर्णत: दुष्काळमुक्त करण्यासाठी 34 हजार 5क्क् कोटी रुपये खर्च करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
Next
मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
नागपूर : राज्य येत्या पाच वर्षात पूर्णत: दुष्काळमुक्त करण्यासाठी 34 हजार 5क्क् कोटी रुपये खर्च करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
गेल्या पाच वर्षात नैसर्गिक आपत्तीत मदत म्हणून शासनाने 8 हजार 377 कोटी रुपये खर्च केले आणि याच कालावधीत शेतीच्या विकासावर केवळ 2 हजार 692 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हे चित्र यापुढे बदलण्यासाठी शाश्वत शेती विकास व आपल्याच गावात पाण्याचा स्नेत निर्माण केला जाईल.दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवार योजना राबविली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुरेसा निधी सिंचन व्यवस्था, जलसंधारण, सूक्ष्म सिंचन यावर खर्च न केल्यामुळे दुष्काळाची झळ शेतक:यांना सतत बसत आहे. तसेच मोठय़ा प्रमाणावर सिंचन प्रकल्पांवर खर्च करून सुध्दा सिंचन प्रकल्प अपूर्ण राहिले व सिंचन क्षमता वाढू शकली नाही. राज्यातील 19 हजार 59 गावांची हंगामी पैसेवारी यावर्षी 5क् पैशांच्या आत जाहीर झाली आहे.
जूनमध्ये फक्त 25 टक्के पाऊस झाल्याने पेरण्या उशिरा झाल्या. नंतर चांगला पाऊस झाला व पेरण्या जरी 1क्2 टक्के झाल्या तरी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसावेळी कमी पाऊस पडल्यामुळे पिकांची परिस्थिती बिकट झाली, अशी माहिती त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)
दुष्काळ निमरूलनासाठी उपाययोजना
4एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्र म 5क् लाख हेक्टर क्षेत्रवर राबविण्यासाठी 6 हजार 437 कोटी रु.खर्च करणार.
4पुढील काळात पाच लाख सोलर पंप शेतक:यांना वाटणार.
4प्रत्येक गावाच्या पाण्याचा हिशेब ठेवणार.
4तीन वर्षापासून सूक्ष्म सिंचनाचे थकलेले अनुदान देणार. त्यासाठी 332 कोटींची तरतूद. पुढील पाच वर्षात किमान 1क् लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली.
42क् हजार सामुदायिक शेततळ्यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्र म, 1क् हजार शेततळी पूर्ण, राहिलेली शेततळी पुढील 2 ते 3 वर्षात घेणार.
4पुढील पाच वर्षात 2.5क् लाख शेततळे व 5क् हजार सिमेंट नाला बांधांची उभारणी. त्याद्वारे 1क् लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली.
4पाण्याच्या साठय़ासाठी गाळ काढण्याचा कार्यक्र म मोठय़ा प्रमाणावर घेतला जाणार, त्यासाठी 5क् कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद.
4राज्यात कोरडवाहू शेती अभियानांतर्गत 5क्क् गावे दुष्काळमुक्त करण्याकरिता 3क्क् कोटी रु.उपलब्ध.1 हजार गावांचा समावेश करून रु पये 5क्क् कोटी उपलब्ध करून दिले जाणार.
4पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविणार.