संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सापडले ३५ बिबटे
By admin | Published: July 27, 2015 01:16 AM2015-07-27T01:16:48+5:302015-07-27T01:16:48+5:30
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कॅमेरा ट्रॅफिकिंग या नवीन पद्धतीने जुलै २०१५ पर्यंत ३५ बिबटे असल्याची माहिती वनअधिकारी क्रिष्णा तिवारी यांनी
ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कॅमेरा ट्रॅफिकिंग या नवीन पद्धतीने जुलै २०१५ पर्यंत ३५ बिबटे असल्याची माहिती वनअधिकारी क्रिष्णा तिवारी यांनी दिली आहे. मात्र, यापेक्षाही जास्त बिबटे राष्ट्रीय उद्यानात असण्याची शक्यता तिवारी यांनी वर्तवली आहे. पूर्वी बिबटे किती आहेत, हे शोधण्यासाठी तगमग तंत्रज्ञानाचा वापर केला जात असे. मात्र, या पद्धतीमुळे बिबट्यांची संख्या किती आहे, याचा निश्चित आकडा मिळत नव्हता. मात्र, कॅमेरा ट्रॅफिकिंगमुळे हा निश्चित आकडा मिळण्यास सोयीचे जाणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.
कॅमेरा ट्रॅफिकिंगमध्ये बिबट्या ज्या वाटेवरून जातो, त्या वाटेचा अंदाज घेऊन रस्त्यातील दोन्ही बाजूंच्या झाडांना हे कॅमेरे लावले जातात. प्रत्येक बिबट्याच्या अंगावरील ठिपके निराळे असतात आणि याच ठिपक्यांवरून बिबटे वेगवेगळे असल्याचे ओळखले
जाते. जंगलात वाढणाऱ्या एका बिबट्याचे आयुष्य १४-१७ वर्षे असते. तसेच जिथे सुरक्षित वातावरण
व खाण्यापिण्याची उत्तम सोय
असेल, त्या ठिकाणी हे बिबटे
आपले बस्तान बसवितात. तसेच आरे कॉलनी हा भाग मात्र वन विभागाच्या संरक्षित क्षेत्रात येत नसल्यामुळे
येथे असणारे ५ ते ६ बिबटे
यांचे संगोपन व्यवस्थित होत नाही आणि ते खाद्याचा शोध घेत रस्त्यावर येतात आणि माणसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढते, असेही तिवारी यांनी सांगितले.