धान्य गोदाम बांधण्यासाठी ३५ टक्के सवलत

By Admin | Published: July 12, 2014 10:18 PM2014-07-12T22:18:21+5:302014-07-12T22:39:51+5:30

सरकारने धान्य गोदामांना सर्वप्रथम प्राधान्य देऊन ३५ टक्के सवलत धान्य गोदाम बांधण्यासाठी जाहीर केल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांनी दिली.

35% discount for building grain godown | धान्य गोदाम बांधण्यासाठी ३५ टक्के सवलत

धान्य गोदाम बांधण्यासाठी ३५ टक्के सवलत

googlenewsNext

चांडोळ : देशातील अन्नधान्याचा साठा लक्षात घेता नरेंद्र मोदी सरकारने धान्य गोदामांना सर्वप्रथम प्राधान्य देऊन ३५ टक्के सवलत धान्य गोदाम बांधण्यासाठी जाहीर केल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांनी दिली.
बुलडाणा तालुक्यातील ग्राम चांडोळ येथे श्री अंबिका अर्बन क्रेडिट सोसायटीच्या धान्य गोदाम लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते. ना.दानवे पुढे म्हणाले की, दरवर्षी शेतकर्‍याकडे जो भाजीपाला पिकविला जातो, त्यातील २५ टक्के भाजीपाला व्यवस्थित साठवण नसल्यामुळे वाया जातो. त्यासाठी शेतकर्‍यांसाठी शितगृह महत्वाकांक्षी प्रकल्प राबविणार असल्याची माहिती देवून ना.दानवे यांनी कोठारी राबवित असलेल्या धान्य गोदाम योजनेचे कौतुक केले. तसेच धाड येथे शिधापत्रिका देण्यासाठी मेळावा घेण्याचे आश्‍वासन दिले. याप्रसंगी आ.विजयराज शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. विजय कोठारी यांनी प्रास्ताविकात धान्य गोदामाची क्षमता ३0 ते ३२ हजार पोती पर्यंंत असून शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमप्रसंगी ना.रावसाहेब दानवे पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमास प्रेमराज भाला, हनुमंत भवर, श्रीराम कुटे, सुरेंद्रप्रसाद पांडे, धनंजय पवार, पांडुरंग उरसाल, मधुसूदन लढ्ढा, शंकर भालेराव, देविदास पाटील, कैलास व्यास, लुनकरण डागा, अशोक कोटेचा, कन्हैय्यालाल कट्टाणी, सौ.रामकौर खरात, सौ.अर्चना पांडे, भगवानदास नागवानी, गजानन राऊत, पंडितराव देशमुख, दिवदयाल वाधवाणी, रामकृष्णदादा शेटे, कैलास शेटे, शाम पठाडे यांच्यासह गजानन देशमुख, सुरेश सोनुने, लक्ष्मीकांत जैस्वाल, प्रतापशेट मेहेर, र्मदानसिंग मेहेर, भास्कर सरोदे, रामधन कानडजे, शांताराम रत्नपारखी यांच्यासह परिसरातील गावकरी उपस्थित होते.

Web Title: 35% discount for building grain godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.