‘त्या’ नगरसेवकांना परमारांकडून ३५ लाख?

By admin | Published: December 21, 2015 02:13 AM2015-12-21T02:13:27+5:302015-12-21T02:13:27+5:30

सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार नगरसेवकांपैकी एकाला बिल्डर सुरज परमार यांनी ३५ लाख रुपये दिल्याचे परमार यांच्या डायरीतील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

35 million from corporators? | ‘त्या’ नगरसेवकांना परमारांकडून ३५ लाख?

‘त्या’ नगरसेवकांना परमारांकडून ३५ लाख?

Next

ठाणे : सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार नगरसेवकांपैकी एकाला बिल्डर सुरज परमार यांनी ३५ लाख रुपये दिल्याचे परमार यांच्या डायरीतील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. याच पद्धतीने अन्य तीन नगरसेवकांनाही तेवढ्याच किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचे वाटप झाले किंवा कसे, याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.
आयकर विभागाला सप्टेंबर २०१४ मध्ये सापडलेल्या परमार यांच्या डायरीत सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या व यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या एका नगरसेवकाला ३५ लाख रुपये दिल्याची नोंद आहे. याखेरीज, अन्य नगरसेवकांनाही मोठ्या रक्कम परमार यांनी दिल्याचे चौकशीत आढळले आहे. मात्र, याकरिता पुरावे गोळा करण्याचे पोलिसांचे काम सुरू आहे. परमार यांच्या डायरीत काही व्यक्तींच्या अद्याक्षरांचा उल्लेख आहे. मात्र, ही मंडळी बाहेर असून ज्यांचा कुठलाही नामोल्लेख डायरीत केलेला नाही, त्या चार नगरसेवकांना पोलिसांनी विनाकारण तुरुंगात डांबल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. त्याचा प्रतिवाद करताना विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी वरील रकमेच्या व्यवहाराची
माहिती न्यायालयाला दिली. सरकारी पक्षाची बाजू ऐकल्यावर न्यायालयानेही त्या नगरसेवकांना जामीन मंजूर केला नाही.
परमार आत्महत्या प्रकरणात सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे या चौघा नगरसेवकांना अलीकडेच अटक झाली. सध्या ते ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. परमार यांच्या बांधकाम व्यवसायाबाबत वारंवार तक्रारी करून या चौघांनी त्यांचा पिच्छा
पुरवला, असे पोलिसांचे मत आहे. या जाचातून सुटका होण्याकरिता परमार यांनी त्यांना मोठ्या रकमा
दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्रास असह्ण झाल्यामुळे परमार यांनी ७ आॅक्टोबर रोजी आत्महत्या केली. (प्रतिनिधी)

Web Title: 35 million from corporators?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.