उल्हासनगरात डेंग्यूचे ३५ संशयित रुग्ण

By admin | Published: November 10, 2014 04:20 AM2014-11-10T04:20:06+5:302014-11-10T04:20:06+5:30

शहरात जानेवारीपासून डेंग्यूचे ३५ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिकेने सात हजार घरांची पाहणी केली आहे.

35 suspected dengue patients in Ulhasnagar | उल्हासनगरात डेंग्यूचे ३५ संशयित रुग्ण

उल्हासनगरात डेंग्यूचे ३५ संशयित रुग्ण

Next

सदानंद नाईक, उल्हासनगर
शहरात जानेवारीपासून डेंग्यूचे ३५ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिकेने सात हजार घरांची पाहणी केली आहे. आरोग्य विभागाने औषध फवारणी, घरांची तपासणी व स्वच्छतेवर भर दिला आहे. आठवड्यातून एक दिवस घर आणि परिसरातील सगळे साठवलेले पाणी ओतून टाकण्याचा आणि परिसर कोरडा करण्याच निर्णय घेण्यात आला आहे.
उल्हासनगरात गेल्या आठवड्यात डेंग्यूचे चार संशयित रुग्ण आढळल्याने पालिका आरोग्य विभागाने फवारणी व घरे तपासणीवर भर दिला आहे. ज्या परिसरात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले, त्या परिसरातील २०० घरांतील नागरिकांची आरोग्य तपासणी केल्याची माहिती पालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दिली. तसेच घरातील पाण्याची तपासणी हिवताप विभागाकडून
होत आहे. डेंग्यूच्या अळ्या आढळणाऱ्या घरांतील पाण्यात जंतूनाशके मिसळण्यात येत
आहेत. पालिकेने यावर उपाययोजना म्हणून साफसफाईवर भर दिला
आहे.
रुग्णांचे प्रमाण वाढले
शहाड फाटक परिसरात सुमिता मोहिते हिला डेंग्यूची लागण झाली असून तिला मुंबई येथे हलविण्यात आले आहे. सुभाष टेकडी परिसरातील स्वप्नाली भगत हिच्यावर शिवनेरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संभाजी चौकातील श्वेता भानुशाली हिला घरी पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. रिजवानी यांनी दिली. आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी शून्य कचरा संकल्पना राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे.
अन्य साथीही बळावल्या
जानेवारीनंतर शहरात तापाच्या १२०० तर मलेरियाच्या १३० रुग्णांची नोेंद पालिका दफतरी झाली आहे. हगवण, अतिसार, गॅस्ट्रो, विषमज्वर आदी रुग्णांची संख्याही हजारांच्या घरात आहे. पालिका आरोग्य विभागाने आयुक्त बालाजी खतगावकर यांच्या आदेशान्वये एक पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक डेंग्यूसारख्या रोगावर लक्ष ठेवून असल्याची माहितीही डॉ. रिजवानी यांनी दिली. मध्यवर्ती रुग्णालयासह शासकीय प्रसूतिगृह रुग्णालयाच्या बाह्ण रुग्ण विभागात तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याची माहिती दिली.

Web Title: 35 suspected dengue patients in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.