३५ हजार पोलिसांचा बंदोबस्त

By admin | Published: September 21, 2015 02:46 AM2015-09-21T02:46:09+5:302015-09-21T14:38:36+5:30

मुंबईसह राज्यात सर्वत्र साजऱ्या होत असलेल्या गणेशोत्सवाच्या काळात मुंबई पोलीस दलातील ३५ हजार जवानांसह राज्य दहशतवादविरोधी दल, फोर्स वन, शीघ्र कृती दल,

35 thousand police custody | ३५ हजार पोलिसांचा बंदोबस्त

३५ हजार पोलिसांचा बंदोबस्त

Next

मुंबईसह राज्यात सर्वत्र साजऱ्या होत असलेल्या गणेशोत्सवाच्या काळात मुंबई पोलीस दलातील ३५ हजार जवानांसह राज्य दहशतवादविरोधी दल, फोर्स वन, शीघ्र कृती दल, एसआरपीएफ, बॉम्बशोधक व नाशक पथक शहरातील विविध ठिकाणी तैनात ठेवण्यात आले आहे. सोमवारी पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. यामध्ये पोलिसांचे विशेष लक्ष वाहतूककोंडी होऊ नये, याकडे असणार आहे.

मुंबईत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात ६,२६९ सार्वजनिक गणपती मंडळांसह ८,९५१ गौरी-गणपती, १ लाख १४ हजार ९३१ घरगुती गणपती आहेत. अशात सोमवारी गौरी-गणपतीसह पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहेत. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार ७६४ सार्वजनिक गणपती आणि ३१ हजार २२९ घरगुती गणपतींचे सोमवारी विसर्जन होणार आहे.

यामध्ये मोठ्या गणपती मंडळांची संख्या कमी असल्याने पोलिसांचे विशेष लक्ष वाहतूक नियंत्रणावर असणार आहे. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, पवई गणेशघाट अशा महत्त्वाच्या विसर्जन ठिकाणांसह शहरातील ११८ विसर्जनाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जनाच्या ठिकाणी पोलिसांसह ५५१ जलसुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. चौपाट्यांवर जास्त गर्दी करू नये, लहान मुलांना आणणे शक्यतो टाळावे, वाहनांचा वापर कमी करावा, असे आवाहन पोलिसांकडून भाविकांना करण्यात येत आहे.

Web Title: 35 thousand police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.