धरणात ३५ टक्के पाणी शिल्लक
By admin | Published: May 12, 2015 01:47 AM2015-05-12T01:47:20+5:302015-05-12T01:47:20+5:30
धो-धो पाणी वापरून पाण्याचा अपव्यय करणाऱ्या मुंबईकरांनो सावधान...मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाण्याची पातळी
कसारा : धो-धो पाणी वापरून पाण्याचा अपव्यय करणाऱ्या मुंबईकरांनो सावधान...मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाण्याची पातळी खालावली असून धरणात फक्त ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जर जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला नाही
तर मुंबईकरांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे. दोन वर्षांपूर्वी कमी पाऊस पडला होता. मात्र,
तरीही पुरेसा पाणीसाठा मेअखेर शिल्लक होता. तुलनेने गेल्या वर्षी मुबलक पाऊस पडूनदेखील
अत्यल्प पाणीसाठा मे अखेर
शिल्लक राहिल्याने मुंबईकरांवर पाणीटंचाईची टांगती तलवार आहे.
सर्वाधिक मोठे व पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे धरण असलेल्या भातसाची सोमवारी पाणीक्षमता ११२.९९ मीटर म्हणजेच ३५:५६ टक्के एवढी मोजली
गेली. गतवर्षी धरण क्षेत्रात
२,८०५ मिमी पाऊस पडूनदेखील मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. भातसासह अन्य तानसा, वैतरणा धरणांतील पाणीदेखील कमी होत असून पाण्याची नासाडी करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा
आहे. (प्रतिनिधी)