अमरावती, अकोल्यात उद्रेकाने उद्यापासून ३६ तास संचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 04:54 AM2021-02-19T04:54:16+5:302021-02-19T06:37:07+5:30

36-hour curfew in Amravati, Akola from tomorrow : या काळात शहर व ग्रामीण भागातील सर्व मुख्य बाजारपेठा बंद असतील. दुकाने, माॅल, काॅम्प्लेक्स बंद असतील. चहा नाष्टा, पान टपऱ्याही बंद असतील.

36-hour curfew in Amravati, Akola from tomorrow | अमरावती, अकोल्यात उद्रेकाने उद्यापासून ३६ तास संचारबंदी

अमरावती, अकोल्यात उद्रेकाने उद्यापासून ३६ तास संचारबंदी

Next

अमरावती/अकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्यांत संचारबंदीचे आदेश जिल्हा दंडाधिकारी अनुक्रमे शैलेश नवाल व जितेंद्र पापळकर यांनी जारी केले. शनिवारी रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३६ तासांसाठी ही संचारबंदी असेल.  

या काळात शहर व ग्रामीण भागातील सर्व मुख्य बाजारपेठा बंद असतील. दुकाने, माॅल, काॅम्प्लेक्स बंद असतील. चहा नाष्टा, पान टपऱ्याही बंद असतील. यातून वैद्यकीय सेवा वगळण्यात आली आहे. सकाळी ६ ते १० या कालावधीत दूध आणि भाजीपाल्याची दुकाने उघडी असतील. 

यवतमाळमध्ये जमावबंदी
यवतमाळमध्ये वाढता प्रादुर्भाव पाहता गुरुवारी जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली. लग्न समारंभ, अंत्यसंस्कारासाठी उपस्थिती अत्यंत मर्यादित करण्यात आली आहे. जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात २३७ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. 

नांदेडमध्ये ३७६ जणांवर दंडात्मक कारवाई
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नांदेडमध्ये गुरूवारी महापालिकेच्या पथकांनी ३७६ जणांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली. 

Web Title: 36-hour curfew in Amravati, Akola from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.