कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेच्या ३६ अनारक्षित विशेष ट्रेन
By admin | Published: July 14, 2015 01:30 AM2015-07-14T01:30:14+5:302015-07-14T01:30:14+5:30
नाशिकमध्ये कुंंभमेळ्यासाठी होणारी गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून ३६ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक रोड ते भुसावळ ते नाशिक रोड
मुंबई : नाशिकमध्ये कुंंभमेळ्यासाठी होणारी गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून ३६ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक रोड ते भुसावळ ते नाशिक रोड आणि इगतपुरी ते ओढा ते इगतपुरीदरम्यान या ट्रेन धावतील, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
ट्रेन नंबर 0१२३९ नाशिकहून १४, १५, १७, १८, १९ जुलैला २०.२५ वाजता सुटून भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी 00.५0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१२४0 भुसावळहून याच दिवशी १४.१0 वाजता सुटून नाशिक रोड येथे त्याच दिवशी १९.१0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१२४१ नाशिक रोड येथून जुलैच्या याच तारखेला 0९.१0 वाजता सुटून भुसावळ येथे त्याच दिवशी १३.१0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१२४२ त्याच तारखांना भुसावळ येथून 0३.0५ वाजता सुटून नाशिक रोडला 0८.१0 वाजता पोहोचेल. या गाड्यांना ओढा, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव येथे थांबा देण्यात येणार आहे.
ट्रेन नंबर 0१२४३ इगतपुरी येथून जुलैच्या १४, १५, १६ तारखेला 0८.१0 वाजता सुटून ओढा येथे त्याच दिवशी 0९.४0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१२४४ ओढा येथून याच दिवशी ११.0५ वाजता सुटून इगतपुरी येथे १३.४0 वाजता पोहोचेल.
ट्रेन नंबर 0१२४५ इगतपुरी येथून जुलैच्या १४, १५, १६, १८ आणि १९ तारखेला १४.३0 वाजता सुटून ओढा येथे त्याच दिवशी १५.४0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१२४६ ओढा येथून याच दिवशी १७.३0 वाजता सुटून इगतपुरी येथे त्याच दिवशी १९.00 वाजता पोहोचेल. या सर्व ट्रेनला देवळाली आणि नाशिक रोड येथे थांबा देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)