अपंग, ज्येष्ठांसाठी ३६ व्हीलचेअर
By admin | Published: October 31, 2016 02:05 AM2016-10-31T02:05:41+5:302016-10-31T02:05:41+5:30
ज्येष्ठ नागरिक आणि अपंग प्रवाशांसाठी ३६ व्हीलचेअर घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
मुंबई : ज्येष्ठ नागरिक आणि अपंग प्रवाशांसाठी ३६ व्हीलचेअर घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे स्थानकांतून बाहेर पडताना वा स्थानकात प्रवेश करताना प्रवाशांची होणारी गैरसोय टळेल, अशी आशा मध्य रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली.
अपंग प्रवाशांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लोकलमधील दुसऱ्या श्रेणीच्या डब्यातही आठ आसने ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेकडून आणखी काही सुविधाही देण्यात येत आहेत. गर्दीतील काही महत्त्वाच्या स्थानकांवर विशेषत: ज्या स्थानकांवर मेल-एक्सप्रेस थांबतात अशा स्थानकांवर अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरची सुविधा देण्यात आली आहे. मात्र त्या अपुऱ्या पडत असल्याने आणखी ३६ व्हीलचेअर पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हीलचेअर सीएसटी ते ठाणे तसेच सीएसटी ते मानखुर्द दरम्यानच्या स्थानकांवर उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे प्लास्टिक बाटल्यांच्या पुनर्वापरासाठीही २0 मशिन बसवणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली.