363 पक्ष्यांच्या आवाजाचा बोलका संग्रह

By admin | Published: August 3, 2014 01:41 AM2014-08-03T01:41:07+5:302014-08-03T01:41:07+5:30

भारतात विविध प्रकारचे 12क्क् पक्षी असून, त्यातील 363 पक्ष्यांच्या आवाजाचा संग्रह सांगलीतील पक्षितज्ज्ञ शरद आपटे यांनी केला आहे.

363 birds voice collection | 363 पक्ष्यांच्या आवाजाचा बोलका संग्रह

363 पक्ष्यांच्या आवाजाचा बोलका संग्रह

Next
सांगली : भारतात विविध प्रकारचे 12क्क् पक्षी असून, त्यातील 363 पक्ष्यांच्या आवाजाचा संग्रह सांगलीतील पक्षितज्ज्ञ शरद आपटे यांनी केला आहे. यासाठी मागील 25 वर्षापासून आपटे यांनी 12 राज्ये पालथी घातली आहेत. पक्ष्यांच्या आवाजाचा अभ्यास करताना आपटे यांनी सह्याद्री पर्वतरांगांमधील विविध पक्ष्यांच्या चित्ररूप, सविस्तर माहितीसह त्यांच्या आवाजाची ‘बर्ड्स ऑफ वेस्टर्न घाट’ या डीव्हीडीची निर्मितीही केली आहे.
पक्ष्यांचे आवाज ध्वनिमुद्रित करण्यासाठी प्रथम पक्ष्यांचे निरीक्षण करणो अत्यावश्यक असते. एखादा पक्षी कोणत्या महिन्यात कुठल्या ठिकाणी असतो, याचा अभ्यास केल्यानंतरच पक्ष्यांचा आवाज ध्वनिमुद्रित करता येतो. 
बँकेत नोकरी करता-करताच आपटे यांनी तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, गोवा, मध्य प्रदेश आदी राज्यांसह भूतानमध्ये जाऊन पक्ष्यांचा अभ्यास केला आहे. हा अभ्यास करीत असताना त्यांच्या लक्षात आले की, पक्ष्यांच्या आवाजाचा संग्रह उपलब्ध नाही. त्यामुळेच त्यांनी पक्षिप्रेमींना उपयुक्त ठरेल या हेतूने सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये प्रवास करून आवाजांचा संग्रह केला. 
सुमारे 7क् ते 8क् मीटर अंतरावर असलेल्या पक्ष्याचा आवाज ध्वनिमुद्रित करण्याचे आपटे यांच्याकडे उपकरण आहे. त्याच्या साहाय्याने त्यांनी अनेक पक्ष्यांच्या सुस्पष्ट आवाजाचे संकलन केले आहे.
 
घरटय़ांची छायाचित्रे काढू नका
च्पक्ष्यांच्या घरटय़ांची छायाचित्रे  काढण्याचा मोह ब:याच जणांना आवरता येत नाही. परंतु कोणीही घरटय़ांची छायाचित्रे काढू नयेत. कारण पक्ष्यांनी फांद्याच्या आडोशाला घरटी बांधलेली असतात. 
च्छायाचित्रे काढताना आपण मधे येणा:या फांद्या तोडतो किंवा वाकवितो. त्यामुळे घरटी उघडय़ावर पडतात व त्यांना श्वापदांपासून धोका संभवतो, असे आपटे सांगतात.
 
सांगली परिसरात आढळणारे पक्षी
सांगलीत आढळणा:या पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने बहिरी ससाणा, गरुड, सर्प गरुड, घुबड, चिमणी, कावळा, शिखरा, सुगरण, 
साळुंकी आदींचा समावेश आहे.  

 

Web Title: 363 birds voice collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.