राज्यात डेंग्यूसाठी ३७ सेंटिनल सेंटर्स

By admin | Published: October 16, 2016 02:35 AM2016-10-16T02:35:44+5:302016-10-16T02:35:44+5:30

जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यापासून राज्यातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. राज्यातून पाऊस परतला असला तरीही साथीचे आजार कायम राहिले आहेत. डेंग्यूच्या

37 Centennial Centers for Dengue in the State | राज्यात डेंग्यूसाठी ३७ सेंटिनल सेंटर्स

राज्यात डेंग्यूसाठी ३७ सेंटिनल सेंटर्स

Next

मुंबई : जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यापासून राज्यातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. राज्यातून पाऊस परतला असला तरीही साथीचे आजार कायम राहिले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळून गुंतागुंत कमी व्हावी यासाठी राज्यभरात ३७ सेंटिनल सेंटर सुरू करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टरांना डेंग्यू रुग्ण व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
राज्यात आॅक्टोबर महिन्यापर्यंत स्थिरावलेल्या पावसामुळे राज्यात नोव्हेंबरपर्यंत साथीच्या आजाराचे रुग्ण आढळून येतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी स्वच्छता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात जानेवारी ते आॅक्टोबरपर्यंत (७ आॅक्टोबर) एकूण ४ हजार ८२० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर २५५, नाशिकमध्ये २२२ आणि पुण्यात १६६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर महापालिका क्षेत्रात मुंबईत ७८३, नाशिकमध्ये ६४० आणि ठाण्यात ४४३ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे.
२६ महापालिका क्षेत्रात ३ हजार
२६० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहर आणि
ग्रामीण परिसरात पसरलेली चिकनगुनियाची साथ अजूनही आटोक्यात आली नाही. जानेवारी ते आॅक्टोबरपर्यंत (७ आॅक्टोबर) पुणे महापालिका क्षेत्र, पिंपरी- चिंचवड, औरंगाबाद येथे ८७७ रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण परिसरात २६६ रुग्ण आढळले आहेत. आॅक्टोबर महिन्यात मुंबईत चिकनगुनियाचे ४ रुग्ण आढळून आले आहेत, तर चिकनगुनियाचे २४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. (प्रतिनिधी)

डेंग्यूचे ४०७ रुग्ण
राज्यात आॅक्टोबर महिन्यात (१ ते ७ आॅक्टोबर) डेंग्यूचे ४०७ रुग्ण आढळले आहेत. पुण्यात असलेला चिकनगुनिया आता मुंबईतही आला आहे. त्यामुळे आता सर्व ठिकाणी विशेष काळजी घेण्याचे आवाहन साथरोग नियंत्रण कक्षाने केले आहे.

Web Title: 37 Centennial Centers for Dengue in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.