मुंबईतून ३७२ उन्हाळी विशेष ट्रेन

By admin | Published: April 28, 2016 06:13 AM2016-04-28T06:13:23+5:302016-04-28T06:13:23+5:30

शाळा, कॉलेजला पडणारी सुटी आणि त्यानिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या पाहता मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रचंड गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागतो.

372 Summer special train from Mumbai | मुंबईतून ३७२ उन्हाळी विशेष ट्रेन

मुंबईतून ३७२ उन्हाळी विशेष ट्रेन

Next

मुंबई : शाळा, कॉलेजला पडणारी सुटी आणि त्यानिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या पाहता मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रचंड गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागतो. गर्दीतल्या प्रवासातून सुटका व्हावी, यानिमित्ताने मध्य आणि कोकण रेल्वेने मिळून तब्बल ३७२ उन्हाळी विशेष ट्रेनचे नियोजन केले आहे.
दरवर्षी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्यांची सोय केली जाते. मेल-एक्स्प्रेस गाड्यांना होणारी गर्दी आणि त्यामुळे वेटिंग लिस्ट येत असतानाही प्रवास करण्याची जोखीम पत्करण्यात येते. त्यामुळे गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन केले जाते. गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता कोकण रेल्वेने १ एप्रिल ते ९ जूनपर्यंत जादा गाड्या उपलब्ध केल्या आहेत. यात आतापर्यंत ४४ ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे दादर-सावंतवाडीसाठी २७, सावंतवाडी-दादरसाठी २३, एलटीटी-करमाळीसाठी आठ, सीएसटी-करमाळीसाठी आठ, दादर-झाराप मार्गावर १४ गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेकडूनही १ एप्रिल ते २६ जूनपर्यंत २४४ उन्हाळी विशेष गाड्यांचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. मध्य रेल्वेनेही दादर-सावंतवाडी-दादर मार्गावर ४६, दादर-झाराप-दादर मार्गावर २६, दादर-भुसावळ-दादर मार्गावर २६, एलटीटी-नागपूर-एलटीटी मार्गावर २६ तसेच एलटीटी-करमाळी-एलटीटी मार्गावर २0 विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक ट्रेन या सोलापूर-मिरज मार्गावर सोडण्यात आल्या असून त्यांची संख्या ही ८२ आहे.

Web Title: 372 Summer special train from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.