‘राज्यातील १७ किल्ल्यांचे थ्रीडी मॅपिंग करणार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2016 02:24 AM2016-11-19T02:24:00+5:302016-11-19T02:24:00+5:30
महाराष्ट्रातील १४ मॉडेल फोर्ट आणि ३ केंद्र संरक्षित किल्यांचे थ्रीडी मॅपिंग करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
मुंबई : महाराष्ट्रातील १४ मॉडेल फोर्ट आणि ३ केंद्र संरक्षित किल्यांचे थ्रीडी मॅपिंग करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
गडकिल्ले थ्रीडी मॅपिंग करण्यासंदर्भातील बैठक गुरुवारी पु.ल. देशपांडे कला अकादमी येथे आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी महाराष्ट्रातील किल्ल्यांचे थ्रीडी मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राचे संचालक सुब्रोतो दास, अजय देशपांडे आणि सांस्कृतिक कार्य विभागासंबंधित अधिकारी उपस्थित होते.
तावडे म्हणाले की, नियोजन विभागाने २८ एप्रिल, २०१६ च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्रातील सुदूर संवेदन उपयोजन केंद्र नागपूर यांना उपग्रह छायाचित्र संकलन व भौगोलिक माहिती प्रणालीचा राज्यात वापर करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. नगरधन, माणिकगड, अंबागड, तोरणा, भुदरगड, गाळणा, औसा, अंतूर, परांडा, खर्डा, धारूर, माहूर, कंधार, शिरगाव, रायगड, सिंधुदुर्ग अशा १७ किल्ल्यांचे थ्रीडी मॅपिंग टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)