ईडीने केली समीर आणि छगन भुजबळांची 4 तास चौकशी
By Admin | Published: March 17, 2016 03:16 PM2016-03-17T15:16:45+5:302016-03-17T15:16:45+5:30
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांची गुरुवारी एकत्र चौकशी करण्यात आली
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १७ - महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांची गुरुवारी एकत्र चौकशी करण्यात आली. सक्तवसुली संचलनालयात (ईडी) ही चौकशी करण्यात आली. चौकशी पुर्ण झाल्यानंतर समीर भुजबळ यांची पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली.
छगन भुजबळ यांना अटक झाल्यापासून पहिल्यांदाच छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची समोरासोर बसवून चौकशी करण्यात आली. तब्बल 4 तास ही चौकशी चालली. सोमवारी ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) भुजबळांना अटक केली होती. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.