गोंदियामध्ये 4 वर्षाचा चिमुरडा बोअरवेलमध्ये अडकला, बचावकार्य सुरु

By admin | Published: March 10, 2016 08:47 AM2016-03-10T08:47:52+5:302016-03-10T08:47:52+5:30

सडक अर्जूनी येथे 4 वर्षाचा मुलगा खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला आहे

4 year old girl in Gondia gets stuck in the borewells and started rescue work | गोंदियामध्ये 4 वर्षाचा चिमुरडा बोअरवेलमध्ये अडकला, बचावकार्य सुरु

गोंदियामध्ये 4 वर्षाचा चिमुरडा बोअरवेलमध्ये अडकला, बचावकार्य सुरु

Next
ऑनलाइन लोकमत - 
गोंदिया, दि. १० - सडक अर्जूनी येथे 4 वर्षाचा मुलगा खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला आहे. विवेकला बोअरवेलमधून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून जेसीबीच्या सहाय्याने बोअरवेलच्या बाजूला अजून एक खड्डा खोदण्याचे काम सुरु आहे. श्वास कोंडला जाऊ नये यासाठी ऑक्सिजनदेखील पाठण्यात आला आहे.  
 
विवेक आपल्या आजी कमलाबाईंसोबत शेतात गेला होता. आजी शेतात काम करत असताना विवेक आपल्या मित्रांसोबत खेळायला गेला. खेळता खेळता तो रामकृष्ण चांदेवार यांच्या शेतात पोहोचला जिथे मंगळवारी बोअरवेल खणून ठेवण्यात आली होती. विवेक कुतुहूलपोटी बोअरवेल पाहायला गेला आणि त्यात पडला. कमलाबाईंनी नातवाचा शोध घेतला मात्र त्यांना तो सापडला नाही. त्यांनी गावातील लोकांना सांगितल्यावर शोधाशोध सुरु झाली. विवेकच्या मित्रांनी त्याला रामकृष्ण चांदेवार यांच्या शेताकडे जाताना पाहिल्याचं सांगितलं. ग्रामस्थांना तो बोअरवेलमध्ये पडला असल्याची शंका आली आणि त्यांनी पोलिसांना कळवलं. 
 
 

 

Web Title: 4 year old girl in Gondia gets stuck in the borewells and started rescue work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.