चार वर्षांत ४९ हजार ठार

By admin | Published: December 22, 2014 04:54 AM2014-12-22T04:54:46+5:302014-12-22T04:54:46+5:30

राज्यातील रस्ते अपघातांत अनेकांचे प्राण जात असून, गेल्या चार वर्षांत (२0१0 ते २0१३ पर्यंत) ४९ हजार ७६५ जणांचा या अपघातांत मृत्यू झाला

In 4 years, 49 thousand people were killed | चार वर्षांत ४९ हजार ठार

चार वर्षांत ४९ हजार ठार

Next

मुंबई : राज्यातील रस्ते अपघातांत अनेकांचे प्राण जात असून, गेल्या चार वर्षांत (२0१0 ते २0१३ पर्यंत) ४९ हजार ७६५ जणांचा या अपघातांत मृत्यू झाला आहे. चार वर्षांपैकी २0१२ मध्ये १३ हजार ३३३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
दारू पिऊन वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे, वाहन वेगाने चालवणे अशा कारणांमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात राज्यात रस्ते अपघात होतात. यात प्रामुख्याने राज्यातील महामार्गांवरील प्रवास तर धोकादायकच समजला जातो. मात्र हे अपघात कमी व्हावेत, यासाठी महामार्ग पोलिसांकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते. तरीही या जनजागृतीकडे वाहनचालकांकडून दुर्लक्ष केले जाते आणि अपघातांना सामोरे जावे लागते. २0१0 ते २0१३ या चार वर्षांत (२0१४ ची आकडेवारी उपलब्ध झाली नाही) राज्यातील रस्ते अपघातांत तब्बल ४९ हजार ७६५ जणांचा मृत्यू झाला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: In 4 years, 49 thousand people were killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.