40 टक्के हृदयरुग्णांना रक्तवाहिन्यांचे आजार

By Admin | Published: August 6, 2014 12:08 AM2014-08-06T00:08:50+5:302014-08-06T00:08:50+5:30

चालताना काही मिनिटांमध्येच पाय दुखतायेत.. पोट:यांना गोळे आल्यासारखे वाटतायेत..अन् हृदयविकाराचाही त्रस आहे.

40% of cardiovascular diseases | 40 टक्के हृदयरुग्णांना रक्तवाहिन्यांचे आजार

40 टक्के हृदयरुग्णांना रक्तवाहिन्यांचे आजार

googlenewsNext
पुणो : चालताना काही मिनिटांमध्येच पाय दुखतायेत.. पोट:यांना गोळे आल्यासारखे वाटतायेत..अन् हृदयविकाराचाही त्रस आहे. तर तुम्हाला रक्तवाहिन्यांचा आजार असण्याची दाट शक्यता आहे. पुण्यातील हृदयविकार असलेल्या 4क् टक्के रुग्णांना रक्तवाहिन्यांचे आजार असल्याचे वैद्यकीयतज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. मात्र, हृदयविकाराबाबत जेवढी जागरूकता समाजात दिसून येते तेवढी जागरूकता रक्तवाहिन्यांच्या आजाराबाबत नाही.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने दर वर्षी 6 ऑगस्टला जागतिक रक्तवाहिनी दिन (वल्र्ड व्हॅस्क्युलर डे) साजरा करण्यात येतो. रक्तवाहिन्यांच्या विविध आजारांमुळे जगभरात अनेकांना आपला जीव अथवा अवयव गमवावा लागत असल्याने त्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. 
याबाबत रक्तवाहिन्यांच्या आजारांचे तज्ज्ञ डॉ. धनेश कामेरकर म्हणाले, की हृदयविकार व इतर आजारांबाबत समाजात जेवढी जागृती वाढली आहे, त्या प्रमाणात अजूनही रक्तवाहिन्यांच्या आजारांबाबत जागृती झालेली नाही. यामुळे या आजाराबाबत अजूनही लोकांना खूप काही माहिती नाही. यामुळे हे आजार होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पुण्यातील हृदयविकार असलेल्या रुग्णांना रक्तवाहिन्यांचे आजार होण्याचे प्रमाण हे 3क् ते 4क् टक्के आहे. हे प्रमाण गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने वाढते आहे.
हृदयविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष हिरेमठ म्हणाले, की पाय दुखणो हा कॉमन त्रस आहे. त्यामुळे अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण, ते कशामुळे दुखतात, हे शोधणो आवश्यक असते. जर 2क्क् ते 5क्क् मीटर चालल्यानंतर एखाद्याचे पाय खूप दुखतात, पोट:यांना गोळे येतात आणि चालवत नाही, त्यांना रक्तवाहिन्यांचा आजार असण्याची दाट शक्यता असते. अशांनी तातडीने उपचार करून घेणो आवश्यक आहे. पाय दुखत असल्यामुळे डॉक्टरांकडे गेल्यानंतर अनेकदा डॉक्टर रुग्णांना कॅल्शियमच्या गोळया देतात. पण त्या रुग्णांना रक्तवाहिन्यांचा आजार असू शकतो, याचा विचारच अजूनही अनेक डॉक्टर करीत नाहीत.(प्रतिनिधी)
 
नव्या उपचारामुळे रुग्णाचा जीव वाचवणो शक्य
रक्तवाहिन्यांचा आजार असलेल्या रुग्णांचे योग्य वेळी निदान झाले, तर त्यांना अर्धागवायू, गँगरीन आदी गंभीर आजारांपासून वाचविले जाते. जर हे आजार झाले असतील, तर नव्या अत्याधुनिक उपचारातून रुग्णाचा जीव व पायासारखे अवयव वाचविले जाऊ शकतात.
 - डॉ. धनेश कामेरकर, रक्तवाहिन्यांच्या आजारांचे तज्ज्ञ
 
हृदयविकाराच्या रुग्णांनी अधिक काळजी घेणो गरजेचे
हृदयविकार आणि मधुमेह असलेल्या रुग्णांना हृदयात रकतवाहिन्यांमध्ये अडथळे असतात. त्यांना शरीराच्या इतर भागांमधील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यांनी त्याची काळजी घेणो जास्त आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी तपासण्या करून घ्याव्यात. 
- डॉ. शिरीष हिरेमठ, 
हृदयरोगतज्ज्ञ
 
रक्तवाहिन्यांचा 
आजार म्हणजे काय?
आपले शरीर, प्रत्येक अवयव कार्यरत राहण्यासाठी रक्ताचा पुरवठा होणो गरजेचे आहे. हे रक्त सर्व ठिकाणी योग्य प्रमाणात सातत्याने पुरविण्याचे काम रक्तवाहिन्या करतात. हृदयाकडून हे सर्व रक्त पंप केले जाते. पण या रक्तवाहिन्यांमध्ये कुठे अडथळा निर्माण होऊन म्हणजेच त्यात कोलेस्टेरॉल जमा होते आणि अवयवांचा रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे जसा हृदयाचा झटका येतो, त्याचप्रमाणो पायाला झटका येऊन गँगरीन होते, 
मेंदूला रक्तपुरवठा कमी 
होऊन अर्धागवायूचा झटका 
येतो. या सर्वाना रक्तवाहिन्यांचे आजार म्हणतात.
 
हा आजार कोणाला होऊ शकतो
हा आजार प्रामुख्याने हृदयविकार, मधुमेही रुग्णांसह धूम्रपान करणा:यांना, उच्च रक्तदाब असणा:यांना, हायपरटेन्शन असणा:यांना होण्याचा सर्वाधिक धोका असतो. सुरूवातीला हा आजार जाणवत नाही. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि काही दिवसांपासून काही वर्षात हा आजार गंभीर रूप धारण करतो. मधुमेही रुग्णांच्या पायाच्या जाणिवा कमी होतात. त्यामुळे पायाला जखम होऊन गँगरीन होण्याचे प्रमाण अधिक असते. रक्तवाहिन्यांचे आजार सर्वाधिक हृदयाला होतात. त्यानंतर पायाला, त्यानंतर किडनीला, त्यानंतर मेंदूला होतात.
 
देशात दर वर्षी गॅँगरीन झालेल्या 
82 हजार जणांचे पाय जातात कापले
मधुमेह झालेल्या रक्तवाहिन्यांच्या आजाराबाबत जनजागृतीच्या अभावामुळे पायाला जमखा होऊन त्यांचे रूपांतर गँगरीनमध्ये होते. गँगरीन म्हणजे, पायाला रक्तपुरवठा न झाल्याने तो भाग काळा पडून खराब होऊ लागतो. दर वर्षी देशात गँगरीन झालेल्या अशा 82 हजार जणांचे पाय कापले जातात. तर जगात प्रत्येकी 3क् सेकंदाला एकाचा पाय गँगरीनमुळे कापला जातो. आशिया खंडात गेल्या 1क् वर्षात हे प्रमाण 57 टक्क्यांनी वाढले आहे, अशी माहिती जागतिक स्तरावरील द लॅनसेट या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे.
 
एका तपासणीतून निदान शक्य
रक्तवाहिन्यांचा आजार आहे का नाही, याचे निदान करणो खूप सोपे आहे. यासाठी अँकल ब्रॉचिअल इन्डेक्स टेस्ट (एबीआय टेस्ट) करता येते. या तपासात दोन्ही हात-दोन्ही पायांचे ब्लडप्रेशर तपासले जाते. जर त्यांचा रेषो क्.9 पेक्षा कमी असेल, तर हा आजार आहे, हे स्पष्ट होते.
 
अॅन्जिओप्लास्टी, बायपासद्वारे उपचार
रक्तवाहिन्यांचा आजार असलेल्या रुग्णांवर अत्याधुनिक उपचार करून त्यांचा गँगरीन झालेला पाय, अर्धागवायू होण्याची शक्यता असल्यास ते टाळणो शक्य आहे. 
यासाठी हृदयविकाराच्या रुग्णांना ज्याप्रमाणो अॅन्जिओप्लास्टी किंवा बायपास केली जाते त्याप्रमाणो रक्तवाहिन्यांची अॅन्जिओप्लास्टी किंवा बायपास केली जाते. 
यामध्ये जेथे रक्तवाहिनीत 
अडथळा निर्माण झाला आहे तेथे स्टेन्ट टाकली जाते. यामध्ये अडथळा असलेल्या ठिकाणी फुग्याच्या माध्यमातून कोलेस्टेरॉल बाजूला 
करून रक्तपुरवठा पूर्ववत केला 
जातो किंवा वेगळी रक्तवाहिनी 
जोडली जाते. 

 

Web Title: 40% of cardiovascular diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.