शिक्षणासाठी ४० मुले घेतली दत्तक
By admin | Published: September 22, 2016 02:13 AM2016-09-22T02:13:07+5:302016-09-22T02:13:07+5:30
गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरीब व गरजू अशी एकूण ४० मुले या शैक्षणिक वर्षातील शिक्षणासाठी दत्तक घेतली.
निमगाव सावा : येथील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष उद्योगपती भास्कर गाडगे यांनी बोरी व आजूबाजूंच्या गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरीब व गरजू अशी एकूण ४० मुले या शैक्षणिक वर्षातील शिक्षणासाठी दत्तक घेतली.
उद्योगपती भास्कर गाडगे हे भास्करशेठ गाडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली ७ ते ८ वर्षे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून आपल्या उत्पन्नातील काही वाटा प्रत्येक वर्षी गोरगरीब, अनाथ यांच्यासाठी खर्च करीत आहेत. या अगोदरही निमगाव सावा व आजूबाजूच्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील सुमारे ३८ मुले, अशी या शैक्षणिक वर्षात एकूण ७८ मुले गाडगे यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतली आहेत.
या कार्यास अधिक प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे, विभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, आळेफाटा पोलीस स्टेशनचे क्रांतिकुमार पाटील, पुणे जिल्हा युवा सेना अध्यक्ष गणेश कवडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद चौधरी, उपतालुका प्रमुख सुनील पवार, विभागप्रमुख विजय थोरात, बोरीच्या सरपंच पुष्पा कोरडे, अशोक कोरडे, सतीश जाधव, सुनील जाधव, बाळू दिवेकर, संजय टेंबे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
(वार्ताहर)
ााडगे म्हणाले की, ग्रामस्थांच्या विनंतीवरून या पुढील काळात साळवाडी, शिरोली, सुलतानपूर, वडगाव कांदळी येथील जिल्हा परिषद शाळेतील गरीब व गरजू मुलांना या शैक्षणिक वर्षासाठी लवकरच दत्तक घेणार आहे.