पाच साखर कारखान्यांना ४० कोटी रुपयांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 01:28 AM2018-11-03T01:28:30+5:302018-11-03T01:28:59+5:30
साखर आयुक्तालयाचा गाळप परवाना न घेताच २०१७-१८च्या हंगामात ऊस गाळप करणाऱ्या ५ साखर कारखान्यांना तब्बल ३९ कोटी ७५ लाख रुपयांचा दंड साखर आयुक्तालयाने ठोठावला आहे.
पुणे : साखर आयुक्तालयाचा गाळप परवाना न घेताच २०१७-१८च्या हंगामात ऊस गाळप करणाऱ्या ५ साखर कारखान्यांना तब्बल ३९ कोटी ७५ लाख रुपयांचा दंड साखर आयुक्तालयाने ठोठावला आहे.
शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व ऊस दर नियामक मंडळाचे सदस्य विठ्ठल पवार यांनी उसाची रास्त आणि किफायतशीर दाराची (एफआरपी) रक्कम शेतकºयांना न देणाºया कारखान्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच त्यांनी न्यायालयात काही कारखान्यांनी विनागाळप परवाना ऊस गाळप हंगाम घेतल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची विचारणाही न्यायालयाने आयुक्तालयाकडे केली होती.
त्यानुसार औरंगाबादच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यास ९.०४ कोटी, घृष्णेश्वर शुगरला ७.५७ कोटी, जळगावच्या चोपडा सहकारी साखर कारखान्यास १.७१, उस्मानाबादच्या शंभू महादेव शुगरला २.९५ आणि बीडच्या जयभवानी साखर कारखान्याला १८.४८ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती साखर आयुक्तालयाने दिली.
एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकºयांना दिल्याशिवाय गाळप परवाने देऊ नयेत असा आदेशही न्यायालयाने साखर आयुक्तालयाला दिला आहे. अजूनही शेतकºयांचे एफआरपीपोटी १०२ कोटी रुपये थकीत असल्याची माहिती पवार यांनी दिली.