शेतकऱ्यांसाठी ४० लाख पंपांची गरज

By admin | Published: May 14, 2016 02:35 AM2016-05-14T02:35:13+5:302016-05-14T02:35:13+5:30

राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऊर्जा बचत करणाऱ्या ४० लाख पंपांची गरज असून, त्यासाठी कोणत्याही कंपन्या पुढाकार घेत असतील तर सरकार त्यांना सर्व प्रकारची मदत करेल

40 lakh pumps for farmers | शेतकऱ्यांसाठी ४० लाख पंपांची गरज

शेतकऱ्यांसाठी ४० लाख पंपांची गरज

Next

मुंंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऊर्जा बचत करणाऱ्या ४० लाख पंपांची गरज असून, त्यासाठी कोणत्याही कंपन्या पुढाकार घेत असतील तर सरकार त्यांना सर्व प्रकारची मदत करेल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रेशखर बावनकुळे यांनी दिले. गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात आयोजित ‘एलईडी एक्स्पो २०१६’च्या उद्घाटनवेळी ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेचे महासंचालक नितीन गद्रे आणि बेस्टचे महासंचालक जगदीश पाटील उपस्थित होते.
ऊर्जा क्षेत्रात एलईडी तंत्रज्ञानाने आपले महत्त्व विशद केल्याचे सांगत चंद्रशेखर बावनकुळे या वेळी म्हणाले की, देशासह विदेशात वाणिज्यिक, उद्योग, घरगुती इत्यादी क्षेत्रात एलईडीचा वापर ऊर्जाबचतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी एलईडी तंत्रज्ञान मोलाची भूमिका बजावत आहे. भारतासारख्या विकसनशील देशाची ऊर्जेची गरज लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकार एलईडी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यास कटिबद्ध आहे. भविष्यात एलईडी तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात सध्या अस्तित्वात असलेले सर्व दिवे/ ट्युबलाईट / पथदिवे हे एलईडीमध्ये बदलण्याबाबतचे आदेश दिले आहेत. शिवाय १०० शहरांतील रस्त्यांवरील पथदिवे बदलून एलईडी पथदिवे बसवण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, या प्रदर्शानात चीन, हाँगकाँग, कोरिया, तैवान आणि अमेरिका येथील १५०हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या असून, हे प्रदर्शन १४ मेपर्यंत खुले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 40 lakh pumps for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.