४० टक्के मुलांचा लठ्ठपणा आनुवंशिक
By admin | Published: February 27, 2017 04:48 AM2017-02-27T04:48:44+5:302017-02-27T04:48:44+5:30
जगातील ४० टक्के मुलांचा लठ्ठपणा आनुवंशिक असल्याचे मत युनिव्हर्सिटी आॅफ ससेक्सच्या संशोधकांनी व्यक्त केला
मुंबई : जगातील ४० टक्के मुलांचा लठ्ठपणा आनुवंशिक असल्याचे मत युनिव्हर्सिटी आॅफ ससेक्सच्या संशोधकांनी व्यक्त केला आहे. भारतातही हीच परिस्थिती असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे. भारतातील तीस लाख लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. या संशोधनात मुले आणि त्यांच्या पालकांच्या बॉडी मास इंडेक्सचा विचार करण्यात आला आहे. ब्रिटन, अमेरिका, चीन, इंडोनेशिया, स्पेन आणि मेक्सिको या देशात हे संशोधन करण्यात आले आहे. प्रोफेसर पिटर डॉल्टन म्हणाले की, विकसित आणि विकसनशील देशातही ही आनुवंशिकता दिसून आली आहे. एक लाख सॅम्पलवर संशोधन केल्यानंतर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. बंगळुरू येथील अपोलो स्पेक्ट्रा अॅण्ड मणिपाल हॉस्पिटलचे सर्जन डॉ. एम.जी. भट म्हणतात की, मुलांमधील लठ्ठपणाला त्यांच्यातील जीन्स कारणीभूत असतात, असे दिसून आले आहे, तर अॅक्सिस हॉस्पिटलचे डॉ. सुप्रित ग्रोव्हर म्हणतात की, लठ्ठपणा हा आनुवंशिकतेशी संबंधित आहे, असे दिसून आले आहे.