४० वर्षांच्या संघर्षाला अखेर यश; केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ललित कला अकादमी केंद्र मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 08:12 PM2020-11-23T20:12:42+5:302020-11-23T20:12:57+5:30

देशातील विविध राज्यांमध्ये ललित कला अकादमीची केंद्रे आहेत. मात्र महाराष्ट्र यापासून अद्यापही उपेक्षितच होता...

The 40-year struggle of artists finally succeeds; Central Government sanctioned Academy of Lalit Arts to Maharashtra | ४० वर्षांच्या संघर्षाला अखेर यश; केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ललित कला अकादमी केंद्र मंजूर

४० वर्षांच्या संघर्षाला अखेर यश; केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ललित कला अकादमी केंद्र मंजूर

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांची पिंपरी चिंचवड येथे हे केंद्र उभारण्यास मंजुरी

पुणे : केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला ललित कला अकादमी केंद्र मंजूर झाल्याने दिवाळीची गोड भेट कलावंताना मिळाली आहे. राज्यात हे केंद्र व्हावे यासाठी तब्बल ४० वर्षे संघर्ष करणाऱ्या कलावंताच्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. त्यानुसार राज्यातील पिंपरी चिंचवड मध्ये हे केंद्र विकसित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याकरिता पिंपरी चिंचवड महापालिकेने बालविकास केंद्राची जागा देण्याची आपणहून तयारी दर्शवली आहे. 

      देशातील विविध राज्यांमध्ये ललित कला अकादमीची केंद्रे आहेत. मात्र महाराष्ट्र यापासून अद्यापही उपेक्षितच होता. राज्यात देखील एक केंद्र असावे या मागणीसाठी चित्रकार, शिल्पकार, यांनी दिल्ली येथे तब्बल 40 वर्षे आंदोलन, उपोषण, मोर्चे यामध्यमातून संघर्ष केला. अखेर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी पिंपरी चिंचवड येथे हे केंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती ललित कला अकॅडमी, दिल्ली चे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी ' लोकमत' शी बोलताना दिली. ते म्हणाले, कला हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्राला कलेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. मात्र तरीही कलेकडे उपेक्षित दृष्टीकोनातून पाहिले जाते. कलेसंदर्भातील शिष्यवृत्तीसाठी कलाकारांना मद्रास किंवा दिल्लीचा रस्ता धरावा लागतो. त्यामुळे कलाकारांचे शिक्षण थांबते. याकरिता महाराष्ट्रात ललित कला अकादमीचे केंद्र व्हावे अशी आमची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. अनेक सरकार आली मात्र केवळ आश्वासनेच मिळाली. जागा मिळायची नंतर ती काढून घेतली जायची. पण मोदी यांनी आमच्या मागणीची दखल घेतली आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी पिंपरी चिंचवड येथे केंद्रास मंजुरी दिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने बालविकास केंद्राची जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. राज्य शासनाच्या परवानगीनंतर सरकार ललित कला केंद्राबरोबर करार करून लवकरच जागा हस्तांतर प्रक्रियेला सुरुवात करेल. .

Web Title: The 40-year struggle of artists finally succeeds; Central Government sanctioned Academy of Lalit Arts to Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.