४० वर्षांत पाप साठल्याने लोकांच्या नशिबी रांगा - मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2016 03:00 AM2016-12-25T03:00:17+5:302016-12-25T03:00:17+5:30

बेनामी संपत्तीला आळा घालणारा कायदा संसदेने मंजूर करूनही मागील सरकारने तो अडवून ठेवला. त्यामुळे बेनामी संपत्तीचे पाप वाढत गेले. हे पाप रोखण्यासाठीच कठोर पावले

In the 40 years of the sin of the people, sin of the people - Modi | ४० वर्षांत पाप साठल्याने लोकांच्या नशिबी रांगा - मोदी

४० वर्षांत पाप साठल्याने लोकांच्या नशिबी रांगा - मोदी

Next

पुणे : बेनामी संपत्तीला आळा घालणारा कायदा संसदेने मंजूर करूनही मागील सरकारने तो अडवून ठेवला. त्यामुळे बेनामी संपत्तीचे पाप वाढत गेले. हे पाप रोखण्यासाठीच कठोर पावले उचलली आहेत. गेल्या ४० वर्षांत देशातील रोगांवर वेळीच इलाज झाला असता तर १२५ कोटी जनतेला आज रांगेत उभे राहावे लागले नसते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला.
पुण्याच्या बहुचर्चित मेट्रोचे भूमिपूजन केल्यानंतर मोदी बोलत होते. व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव पाटील, सुप्रिया सुळे, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे उपस्थित होते़
मोदी म्हणाले, ‘‘नोटाबंदीनंतर ज्यांनी बॅँकेत पैसे टाकून काळ्याचे पांढरे केले त्यांनी खूश होण्याचे कारण नाही. कारण त्यांचा पैसा नाही, तर चेहरा काळा झाला आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागणार आहे. पूर्वी पैसे नव्हते, आता कोठून आले हे विचारले जाणार आहे. या बेइमानांनी आता तरी सांभाळावे. अजूनही संधी आहे. चांगल्या रस्त्यावर या. गरिबांच्या हक्काचे पैसे त्यांना परत द्या. नाहीतर वाचण्याची संधी मिळणार नाही. आयुष्यभर त्यांना सुखाची झोप मिळू नये यासाठी मीसुद्धा झोपणार नाही.’’ नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्यांना जितक्या वेदना झाल्या, तितक्याच मला झाल्या, असेही त्यांनी सांगितले. मागच्या सरकारांनी खूप कामे माझ्यासाठी बाकी ठेवल्याने चांगली कामे करण्याची संधी मला मिळाली असल्याचे सांगून मोदी म्हणाले,
‘‘तत्कालिक राजकीय फायद्याचा विचार न करता भविष्यवेधी विचार करून समस्यांवर उत्तर शोधण्यात येईल. देशात सर्वत्र वेगाने शहरीकरण होत असून त्यासाठी दोन पातळ्यांवर उपाययोजनांची तयारी आमच्या सरकारने केली आहे. शहराकडील ही धाव कमी करण्यासाठी गावांमध्येच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच जीवनमानाचा दर्जा सुधारला जाईल. पुढच्या २५ ते ३० वर्षांचा विचार करून विकासकामे केली जातील.

हायवे आणि आयवे
देशभरातील अडीच लाख पंचायती आॅप्टिकल फायबरने जोडण्याचे काम सुरु केले आहे़ डिजिटल इंडियामध्ये संपूर्ण देशाला जोडण्याचे काम आहे़ एक काळ असा होता की, लोकांना पायाभूत सुविधामध्ये पाणी, रोड, रेल्वे, विमानतळ यांचा समावेश होता़ आता हायवे पाहिजे, त्याबरोबर आयवेही (आॅप्टिकल फायबर) पाहिजे आहे़

डबल इंजिनची ताकद
गेल्या १५ वर्षात महाराष्ट्राची गाडी खड्ड्यात फसली आहे़ तिला बाहेर काढण्यासाठी डबल इंजिनची ताकद पाहिजे़, असे मी विधानसभा निवडणुकीच्या वेळीच सांगितले होते. केंद्र आणि राज्य सरकार अशी डबल इंजिनची ताकद राज्यातील जनतेने दिल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे आभार मानले़

पवारांना भाषणाची संधी नाहीच
पुणे मेट्राच्या भूमिपूजन समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना व्यासपीठावर स्थान मिळावे यासाठी महापौर प्रशांत जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जंगजंग पछाडले़ त्यासाठी काँग्रेसला बरोबर घेऊन महापालिकेत पवार यांच्या हस्ते भूमिपूजनाचा ठरावही संमत करुन घेतला़ शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईनंतर शरद पवार यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले़ मात्र, त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. उलट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी गेल्या
१५ वर्षांतील सरकारांचे पवारांसमोर वाभाडे काढले.

Web Title: In the 40 years of the sin of the people, sin of the people - Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.