ठाणो, मेळघाटात पाच महिन्यांत 400 बालमृत्यू

By admin | Published: December 13, 2014 01:54 AM2014-12-13T01:54:40+5:302014-12-13T01:54:40+5:30

ठाणो जिल्ह्यात 220 बालके व 11 मातांचे तर जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांच्या कालावधीत अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात 180 बालकांचे मृत्यू झाले आहेत.

400 children died in Thane, Melghat, in five months | ठाणो, मेळघाटात पाच महिन्यांत 400 बालमृत्यू

ठाणो, मेळघाटात पाच महिन्यांत 400 बालमृत्यू

Next
कुपोषणाचा इन्कार : वैद्यकीय कारणास्तव बळी गेल्याचा सरकारचा पवित्र
नागपूर- जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत ठाणो जिल्ह्यात 220 बालके व 11 मातांचे तर जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांच्या कालावधीत अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात 180 बालकांचे मृत्यू झाले आहेत.
आतार्पयत विरोधी बाकावर बसलेले असताना हे मृत्यू कुपोषणामुळे झाल्याचा दावा करणा:यांनी सत्तेत येताच विविध वैद्यकीय कारणास्तव हे मृत्यू झाल्याचा पवित्र घेतला आहे. विधान परिषदेत ठाणो जिल्ह्यातील बालमृत्यूंबाबत धनंजय मुंडे, नरेंद्र पाटील आदींनी विचारलेल्या प्रश्नावर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, जून ते ऑक्टोबर 2क्14 या कालावधीत 11 माता व 22क् नवजात बालकांचे मृत्यू झाले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत 7 माता मृत्यू व 234 नवजात बालकांचे मृत्यू झाले होते. 
माता मृत्यूमधील वाढ वैद्यकीय कारणास्तव झालेली आहे. गरोदर मातांची नोंदणी करून त्यांना धनुर्वाताचे इंजेक्शन देणो व लोहयुक्त गोळ्या देणो, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमात प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान व प्रसूतीपश्चात देण्यात येणा:या वैद्यकीय सुविधांची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. 
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात जुलै ते ऑक्टोबर 2क्14 या कालावधीत 18क् बालकांचे मृत्यू झालेले आहेत, अशी कबुली सुनील तटकरे, हेमंत टकले आदींनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. त्यामध्ये कमी वजनामुळे 18, तापसदृश आजारामुळे 1क्, डायरियामुळे 5, न्युमोनियामुळे 28, कमी दिवसाच्या प्रसूतीमुळे 11, अॅसपेक्शियामुळे 23, सेप्टीसिमियामुळे 19, इतर आजारांमुळे 42 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
राज्यात काँग्रेस प्रणीत सरकार असताना ठाणो, मेळघाट येथील बालमृत्यू विविध आजारांमुळे होत असल्याचे शिवसेना मान्य करीत नव्हती. कुपोषण हीच मूळ समस्या असल्याचा दावा करीत होती. आता आरोग्य खाते शिवसेनेकडे आल्यावर मात्र कुठेही हे बालमृत्यू कुपोषणाने झाल्याचे मान्य केलेले नाही, असे विरोधकांचे म्हणणो आहे. (विशेष प्रतिनिधी)

 

Web Title: 400 children died in Thane, Melghat, in five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.